vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत एक महत्त्वाचा तांत्रिक बदल करण्याचा निर्णय-महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी…

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत एक महत्त्वाचा तांत्रिक बदल करण्याचा निर्णय-महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांचा गोंधळ टाळण्यासाठी…

राज्य प्रतिनिधी

आगामी महानगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत एक महत्त्वाचा तांत्रिक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ईव्हीएम यंत्राच्या बॅलेट युनिटवर असलेले ईनडी बटन आता पांढऱ्या मास्किंग टेपने बंद करण्यात येणार आहे. मतदानादरम्यान मतदारांमध्ये होणारा गोंधळ आणि तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी हा महत्त्वपूर्ण आदेश जारी करण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती किंवा एकापेक्षा जास्त मते देण्याची पद्धत असते. जर एखाद्या मतदाराला त्याच्या कोट्यातील सर्व मते द्यायची नसतील, तर आपले मतदान पूर्ण झाले आहे हे दर्शवण्यासाठी यापूर्वी ईनडी बटन दाबण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती. हे बटन बॅलेट युनिटवरील शेवटच्या क्रमांकावर असते.

 

राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे की, ईनडी बटन वापराबाबत अनेक मतदारांमध्ये संभ्रम आहे. अनेक मतदार पहिले किंवा दुसरे मत दिल्यानंतर चुकून ईनडी बटन दाबतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या वाट्याची उर्वरित मते देता येत नाहीत. अशी ही सदर बातमी सह्याद्री बातम्यांमध्येही आलेली आहे

 

संबंधित पोस्ट

मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संपर्क व्यवस्था उभारणीवर भर- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मच्छिमारांना ५ सॅटेलाईट फोनचे वितरण

रुग्णालयांच्या शुल्कावर नियंत्रणासह कर्करोग उपचारांसाठी नवीन पॅकेजेस· आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकरआरोग्य सेवांचे निकष सुधारणार

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ५० हून अधिक हिंदू संघटनांची उपस्थिती!शिवछत्रपतींचा अवमान सहन करणार नाही; ‘शिवाजी विद्यापिठा’च्या नामांतरासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार!

vishwatmaklokswamivarta

मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांचा जिल्हा दौरा

vishwatmaklokswamivarta

विना नंबर टिप्पर आणि अवैध गौणखनिज वाहतुकीवर कडक कारवाई! 5 महिन्यांत 339 विना नंबर टिप्परवर कारवाई, 35 लाखांचा दंड वसूल…

सावेडी बस स्थानकामुळे प्रवाशांना अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील