vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराणा प्रताप सिंहांचे जीवन म्हणजे स्वाभिमान, त्याग व स्वराज्यासाठीचा झुंजार लढा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

महाराणा प्रताप सिंहांचे जीवन म्हणजे स्वाभिमान, त्याग व स्वराज्यासाठीचा झुंजार लढा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राज्य प्रतिनिधी-अमळनेर, महाराणा प्रताप सिंह हे केवळ राजे नव्हते, तर स्वराज्यासाठी लढणारे असामान्य योद्धा होते. त्याग, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रेम ही त्यांची ओळख असून युवा पिढीने त्यांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

अमळनेर येथे महाराणा प्रताप सिंह जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, जि.म.स. बँकेचे चेअरमन संजय पवार आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी प्रतिमापूजन करून महाराणा प्रतापांना अभिवादन केले.

स्वाभिमानासाठी त्यांनी कधीही तडजोड केली नाही, हे त्यांच्या संघर्षमय जीवनातून स्पष्ट होते, असे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. जिद्द, निष्ठा आणि देशप्रेम या गुणांचे महत्त्व आजच्या तरुणांनी आत्मसात करावे, असे आमदार अनिल पाटील यांनी नमूद केले.

०००

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात कृत्रिम वाळू (एम-सॅण्ड) युनिट स्थापनेसाठी इच्छुकांनी अर्ज सादर करावेजिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सौर ऊर्जा प्रकल्पाची दलित आदिवासी जमिनीत बळजबरी उभारणी केल्यास तीव्र आंदोलन छेडू – अ‍ॅड. भास्कर मगरे

मांतग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती; अर्ज करण्याचे आवाहन

मागास भागातील समुदायाचे कल्याण आणि समृद्धी साधण्यास प्राधान्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या पुढाकाराने एटापल्ली तालुक्यात बाएफ संस्थेमार्फत कार्यान्वित प्रकल्पामुळे रोजगार संधीत वाढ, समुदाय कल्याण पूरक उपक्रमात स्थानिकांचा सक्रिय सहभाग..

छत्तीसगड राज्यात लव्ह जिहाद व धर्मांतरविरोधी कठोरकायदा करणार मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचे आश्वासन !हिंदु जनजागृती समिती व हिंदुत्वनिष्ठ यांची छत्तीसगडचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासह बैठक..

vishwatmaklokswamivarta

महाबळेश्वर, जावळी तालुक्यातील कोयना जलाशयातील बुडीत बंधारे बांधण्यासाठी १७० कोटी रूपयांची तरतूद…

vishwatmaklokswamivarta