vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

धान अपहार प्रकरण: देऊळगाव खरेदी केंद्रातील धान अपहार प्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा; प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाची कारवाई

धान अपहार प्रकरण: देऊळगाव खरेदी केंद्रातील धान अपहार प्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा; प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाची कारवाई

 

गडचिरोली प्रतिनिधी

: गडचिरोली जिल्ह्यातील देऊळगाव खरेदी केंद्रात उघडकीस आलेल्या धान अपहार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगाव येथे पणन हंगाम २०२३-२४ व हंगाम २०२४-२५ मधे आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदी करण्यात आला होता. परंतु साठा पुस्तकानुसार व प्रत्यक्ष शिल्लक धान यात प्रथम दर्शनी तफावत आढळल्यामुळे शिल्लक धानाची मोजणी व्यवस्थापकीय संचालक नाशिक यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

त्या मोजणीत दोन्ही हंगामात १००८४.०८ क्विंटल धान कमी आढळून आला. त्यामुळे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था देऊळगावचे सचिव, संचालक, तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी अशा एकूण 17 जणांविरुद्ध काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा पोलीस स्टेशन कुरखेडा येथे प्रथम खबर क्रमांक 69 अन्वये नोंदविण्यात आला आहे.

देऊळगाव खरेदी केंद्रात मोठ्या प्रमाणावर धान अपहार झाल्याची बाब भेटीदरम्यान निदर्शनास आली होती. माध्यमातून यावर आक्षेपण देण्यात आले होते. याची दखल घेऊन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी देखील आरोपींवर कारवाईचे निर्देश दिले होते. आरोपींमध्ये संस्थेचे सचिव, संचालक मंडळातील सदस्य, तसेच काही कर्मचारी आणि अधिकारी यांचा समावेश असल्याचे प्रादेशिक व्यवस्थापक सोपान संभारे यांनी कळविले आहे.

संबंधित पोस्ट

क्रीडासह अनेक क्षेत्रात महाराष्ट्राकडून देशाचे नेतृत्व – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन पुरस्कार विजेत्यांनी राज्यातल्या खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

जिल्हा व सत्र न्यायालय येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

vishwatmaklokswamivarta

राज्यात सातत्याने बदलणारे हवामान आणि अनिश्चित पावसामुळे पीक उत्पादनावर मोठा परिणाम, पीक पद्धतीचा सखोल अभ्यास करून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले

vishwatmaklokswamivarta

टेमघर प्रकल्पाचे मजबुतीकरण, गळती रोखण्याच्या कामांसाठी३१५ कोटी ५ लाख रूपयांच्या खर्चास मान्यता..

vishwatmaklokswamivarta

समता आणि बंधुत्वाचा संदेश देणारे संत रविदास महाराजांचे स्मारक ठरणार समाजासाठी प्रेरणास्थान: खासदार कल्याण काळे-जगतगुरु संत शिरोमणी रविदास महाराज स्मारक समितीतर्फे भव्य स्मारकासाठी साकडे; सामाजिक समरसता आणि एकतेचा जागर करण्याचा खासदारांचा निर्धार

*श्री तुळजाभवानीदेवीच्या ४ हजार एकर जमीन महाघोटाळ्याची सखोल चौकशी करण्याचे महसूलमंत्र्यांचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश !* – महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पाठपुराव्याला यश…