vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिऊर बंगला ते नांदगाव रस्त्याच्या कामाचे पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते भुमिपूजन…

शिऊर बंगला ते नांदगाव रस्त्याच्या कामाचे पालकमंत्री शिरसाट यांच्या हस्ते भुमिपूजन…

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी वैजापूर तालुक्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून भरघोस निधी देऊ व येथील जनतेची कामे करु असे आश्वास्न राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी आज तलवाडा ता. वैजापूर येथे केले.तलवाडा येथे शिऊर बंगला ते नांदगाव यामार्गाच्या भूमिपुजन कार्यक्रमात ते बोलत होते.

तलवाडा येथे पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते शिऊर बंगला ते नांदगाव मार्गाचे सिमेंट कॉंक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले. आमदार प्रा. रमेश बोरनारे, कन्नडच्या आमदार संजना जाधव, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर, अभय चिकटगावकर, राजेंद्र जंजाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 त्यानंतर पालकमंत्री शिरसाट यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. संजय निकम, साबेर खान, राजीव डोंगरे, बाबासाहेब जगताप, ज्ञानेश्वर जगताप,भागीनाथ मगर, रामहरी जाधव, राजेंद्र मगर, नारायण कवडे, विशाल शेळके, संजय बोरनारे, कल्याण दंगोडे, रिखाब पाटणी, कचरू डिके, उत्तमराव निकम, एल एम पवार,गोरख आहेर, प्रशांत शिंदे,प्रभाकर जाधव, अंबादास खोसे, बाबासाहेब राऊत, किशोर मगर, अनिल भोसले, संतोष सूर्यवंशी, शांताराम मगर, राजेंद्र साळुंके, सुभाष आव्हाळे, राधाकृष्ण सोनवणे, प्रमोद मगर, भारत साळुंके, डॉ अर्जुन साळुंके, बाळासाहेब जाधव, यांच्यासह तलवाडा, शिऊर, लोणी खुर्द, वाकला आदी ग्रामस्थ उपस्थित होते.०००००

संबंधित पोस्ट

नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी ‘सी-ट्रिपल आयटी’ मंजूर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराला टाटा टेक्नॉलॉजीचा सकारात्मक प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहाय्य -*उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सन 2026-27 मधील नमुंमपा क्षेत्रातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर

भारतीय कर्णबधिर क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेत एकतर्फी वर्चस्व सिद्ध करत दणदणीत विजय नोंदवला

रायगड जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन   — जिल्हाधिकारी किशन जावळे क्षयरोग मुक्त 376 ग्रामपंचायतींचा सत्कार

बुधवारी आंबा महोत्सव: प्रदर्शनी व विक्री