vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जैन समाजाच्या शैक्षणिक प्रगतीला आणि युवा उद्योजकतेला मिळणार चालना जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळ यांच्यात सामंजस्य करार

जैन समाजाच्या शैक्षणिक प्रगतीला आणि युवा उद्योजकतेला मिळणार चालना

जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळ यांच्यात सामंजस्य करार

नवी दिल्ली, प्रतिनिधी: महाराष्ट्रातील जैन समाजाच्या शैक्षणिक प्रगतीला आणि युवा उद्योजकतेला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय आज नवी दिल्लीत घेण्यात आला. महाराष्ट्र शासनाचे जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळ यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार १०० कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्रासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाच्या मुख्यालयात या सामंजस्य करारावर जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी, व्यवस्थापकीय संचालक मेघना शिंदे तसेच राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाचे महाव्यवस्थापक अनिल कुमार यांनी महामंडळाच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक आभा रानी सिंग यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वाक्षऱ्या केल्या

यावेळी जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे समन्वयक संदीप भंडारी, विकास आच्छा, विपिन जैन तसेच राष्ट्रीय अल्पसंख्यांक विकास व वित्त महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते

या करारामुळे जैन समाजातील अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सुलभ व कमी व्याजदरात शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार आहे. तसेच युवा उद्योजकांना उद्योग-व्यवसाय उभारण्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य मिळणार असल्याने रोजगारनिर्मितीला चालना मिळून जैन समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणाला नवी दिशा मिळणार आहे.या करारामुळे जैन समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची नवी संधी, तर नवउद्योजकांना आर्थिक पाठबळ उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्रातील जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हा करार एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरणार आहे.

०००

 

संबंधित पोस्ट

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध – पालकमंत्री नितेश राणे

पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कच्या पायाभूत सुविधांचा पहिला टप्पा पूर्ण;केंद्रीय सचिव नीलम शमी राव यांनी केली पाहणी

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण येथे ६० जप्त वाहनांचा २७ मे रोजी ई-लिलाव* *इच्छुकांनी २१ मे पूर्वी नोंदणी करावी

आदिवासी भागात पाणी पुरवठा योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटीलअकोले तालुक्यातील प्रशासकीय आढावा बैठकीत विकासकामे, पाणीपुरवठा, प्रलंबित योजनांचा आढावा

मीरा-भाईंदरमधील बीएसयूपी लाभार्थ्यांचे पुनर्वसन पीपीपी तत्त्वावर- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

सातारा जिल्ह्यातील युगप्रवर्तक कवी बा.सी. मर्ढेकर यांच्या निवास्थानाचा स्मारकापर्यंतचा प्रवास आणि या प्रवासास दिल्ली येथे* *होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिलेला उजाळा**गोष्‍ट बा.सी. मर्ढेकर यांच्या स्मारकाची….*

vishwatmaklokswamivarta