vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यास्पर्धा परीक्षा-2026 चे वेळापत्रक संकेत स्थळावर उपलब्ध

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यास्पर्धा परीक्षा-2026 चे वेळापत्रक संकेत स्थळावर उपलब्ध

नवी मुंबई, प्रतिनिधी  :- राज्याच्या प्रशासकीय सेवेतील गट अ आणि गट ब संवर्गातील विविध रिक्त पदे भरती प्रक्रियेसाठी सन 2026 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत नियोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबईचे अवर सचिव र. प्र. ओतारी यांनी दिली आहे.

शासनाच्या मागणीनुसार शासन सेवेतील विविध पदांवरील भरतीकरिता आयोगामार्फत वर्षभर विविध परीक्षांचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन 2026 मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांचे दिनांक निश्चित करण्यात आले आहे. हे वेळापत्रक आयोगाच्या https://mpsc.gov.in आणि https://mpsconline.gov.in या संकेतस्थळांवर प्रसिध्द करण्यात आले आहेत. प्रसिध्द करण्यात आलेले हे वेळापत्रक अंदाजित वेळापत्रक असून, जाहिरातीच्या अथवा परीक्षेच्या प्रस्तावित महिना/दिनांकामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होवू शकतो. असा बदल झाल्यास तो आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

संबंधित परीक्षेचे परीक्षायोजना, अभ्यासक्रम, निवड पद्धत इत्यादी तपशील आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे आणि तो वेळोवेळी अद्यावत करण्यात येईल. संबधित परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येबाबतचा सविस्तर तपशील जाहिरात/अधिसुचनेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येईल. वेळापत्रकातील सन 2026 मधील दिनांक निश्चित नसलेल्या परीक्षांचे दिनांक संबधित परीक्षेच्या जाहिरात/अधिसूचनेद्वारे स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येतील. आयोगाकडून आयोजित परिक्षेच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यावयाची आहे. याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वत:घेणे आवश्यक आहे, असे ही प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.टिप :- बातमी सोबत स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जोडण्यात आला आहे

संबंधित पोस्ट

राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा…

vishwatmaklokswamivarta

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत आयोजित ‘संवादवारी’ उपक्रमाअंतर्गत प्रदर्शन, चित्ररथ, एलईडी व्हॅन , कलापथक, पथनाट्याच्या माध्यमातून शासकीय योजनांचा जागर सुरू आहे. तरडगाव व फलटण येथे या उपक्रमाला वारकरी व ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला.चित्ररथाचे विशेष आकर्षण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी शाळकरी विद्यार्थिनींनी रक्षाबंधननिमित्त राख्या बांधल्या आणि या सणाच्या शुभेच्छा दिल्या.

आदिवासी बांधवांसोबत वनजागेवरील २५ हजार झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसनाला गती

vishwatmaklokswamivarta

डॉ बाबासाहेब आंबेडकर संकल्प भूमी स्मारक कामाची केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी* 

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय ‘वीर गाथा 5.0’ मध्ये महाराष्ट्र अव्वल-देशातील सुपर 100 मध्ये सर्वाधिक 19 विजेते महाराष्ट्राचे

vishwatmaklokswamivarta