vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दक्षता जनजागृती सप्ताहाला भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथेने सुरवात…

दक्षता जनजागृती सप्ताहाला भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथेने सुरवात…

 अमरावती, प्रतिनिधी : लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दि. २७ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दक्षता जनजागृती सप्ताहाला भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथेने सुरवात करण्यात आली.

सदर सप्ताह दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दि. ३१ ऑक्टोबर रोजीच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात येतो. या वर्षीच्या दक्षता जनजागृती सप्ताहाची संकल्पना ‘दक्षता आपली सामायिक जबाबदारी’ या घोषवाक्यावर आधारीत राहणार आहे. सप्ताहाची सुरुवात सोमवार, दि. २७ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र कार्यालयात भ्रष्टाचार निर्मूलनाची शपथ घेऊन करण्यात आली. यावेळी सप्ताहानिमित्त राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन करण्यात आले.

कार्यक्रमाला लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक सुनिल किनगे आदी उपस्थित होते. जनजागृती उपक्रमात अमरावती शहरातील बसस्थानक आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात भिंतीपत्रके लावण्यात आली. तसेच नागरिकांना पत्रके वाटून जनजागृती करण्यात आली. दक्षता जनजागृती सप्ताहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून भ्रष्टाचार निर्मूलन संबंधाने जनजागृतीपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

भ्रष्टाचारासंबंधाने काहीही तक्रार असल्यास भ्रष्टाचार विरोधी तक्रारीसाठी फोन क्रमांक ०७२१/२५५३०५५ किंवा ०७२१/२६६४९०२, टोल फ्री क्रमांक : १०६४, व्हॉट्सॲप क्रमांक: ७५१७५७१०६४ तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, ललीत सेंटर, परांजपे कॉलनी, कॅम्प, अमरावती येथे प्रत्यक्ष येऊन भेटावे, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

कोकणातील प्रगतशील शेतकऱ्यांसोबत कृषिमंत्री साधणार संवाद

vishwatmaklokswamivarta

जिल्हा न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा-न्यायालयीन कामकाजात अधिकाधिक मराठीचा वापर करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

माझं लातूर, हरित लातूर’ अभियानांतर्गत यंदा सलग दुसऱ्या वर्षी लातूर शहरातील गंजगोलाई येथे आयोजित ‘लातूर हरितोत्सव’चे उद्घाटन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते संपन्न

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन भेसळयुक्त अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्याची माहिती देण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत आतापर्यंतजिल्ह्याचे योगदान सव्वा तीन कोटी रुपयांचे

vishwatmaklokswamivarta

परभणीतील शेतकऱ्यांना पाणी उपलब्धता वाढविण्यास प्राधान्य द्यावे – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर जलसंधारण व सिंचन क्षमतेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे