vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शिक्षक मतदार नोंदणीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 6 नोव्हेंबरपर्यंतमतदार नोंदणीसाठी अर्जाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध

शिक्षक मतदार नोंदणीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 6 नोव्हेंबरपर्यंतमतदार नोंदणीसाठी अर्जाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध

 अमरावती , प्रतिनिधी) :भारत निवडणूक आयोगाने दि. 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित अमरावती विभागातील शिक्षक मतदार मतदारसंघात नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. मतदार यादी कार्यक्रमानुसार नमुना क्रमांक 19 व्दारे अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 6 नोव्हेंबर, 2025 असा आहे.

 त्याचप्रमाणे शिक्षक मतदार संघासाठी नमूना क्रमांक-19 मधील अर्ज भरण्याची सुविधा आता ऑनलाईन उपलब्ध असून त्यासाठी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर लॉगीन करून पात्र शिक्षकांना आवश्यक त्या पुरावा कागदपत्रांसह दिनांक 6 नोव्हेंबर, 2025 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येईल.

 त्याप्रमाणे शिक्षक मतदार संघासाठी विहित नमूना क्रमांक-19 मधील अर्ज आवश्यक पुराव्यांसह संबंधित सहायक मतदार नोंदणी अधिकारी, पदनिर्देशित अधिकारी यांच्याकडे ऑफलाईन दाखल करण्याची कार्यपध्दतीही मतदार नोंदणी कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार दिनांक 6 नोव्हेंबर, 2025 रोजी पर्यंत सुरु आहे.

 उपरोक्त सुविधेबाबतची नोंद सर्व संबंधितांनी घ्यावी व पात्र शिक्षकांनी आपले अर्ज अंतिम दिनांकापर्यंत सादर करावे, असे आवाहन प्र. जिल्हाधिकारी तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ गोविंद दानेज यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल (AA+ STABLE)’ या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महानगरपालिका सलग अकराव्यांदा मानकरी..

शिवनगर येथे स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर; १५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागरक्तदान हेच जीवनदानचा संदेश; सेवा व समर्पणातून मानवतेचा जागर

घोडबंदर रोडचे नामकरण मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पा मार्ग करा उपमहापौर कृष्णा पाटील यांची महासभेत प्रस्तावाची सूचना

रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक आपत्ती उपाययोजनांबाबत आढावा बैठक संपन्न..

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत लोकचळवळ उभी करण्यासाठी ठाण्यात कार्यशाळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा शाळेतील माजी विद्यार्थिनी पश्चिम विभागाची कर्णधार फुटबॉलपटू राबिया शेख यांचा आयुक्तांनी केला विशेष सत्कार…

vishwatmaklokswamivarta