vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल (AA+ STABLE)’ या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महानगरपालिका सलग अकराव्यांदा मानकरी..

आर्थिक सक्षमतेच्या ‘डबल ए प्लस स्टेबल (AA+ STABLE)’ या राष्ट्रीय पत मानांकनाची नवी मुंबई महानगरपालिका सलग अकराव्यांदा मानकरी..

     नवी मुंबई प्रतिनिधी -“इंडिया रेटींग अँड रिसर्च” (फिच) या राष्ट्रीय स्तरावरील अर्थविषयक मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी विविध संस्थांचे पत मानांकन जाहीर करण्यात येते. यामध्ये मागील 10 वर्षांप्रमाणेच याही वर्षी “इंडिया डबल ए प्लस स्टेबल (AA+ Stable)” हे सर्वोत्तम पत मानांकन नवी मुंबई महानगरपालिकेस सन 2024-25 करीता जाहीर झाले असून अशाप्रकारे आर्थिक सक्षमतेचे डबल ए प्लस मानांकन सातत्याने अकरा वर्षे मिळविणारी नवी मुंबई ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे.

          देशातील निवासयोग्य शहरांमध्ये आघाडीवर असणा-या नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांसाठी पुरविण्यात येणा-या सेवासुविधांच्या दर्जाकडे बारकाईने लक्ष देत नेहमीच दूरगामी दृष्टीकोन राखला आहे. महसूलविषयक जमा व खर्चाच्या बाबींकडेही काटेकोर लक्ष दिले आहे. जमा-खर्चाचा योग्य ताळमेळ राखण्याकडे महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे बारकाईने लक्ष असून त्याला मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.सत्यवान उबाळे यांच्या नियंत्रणाखाली संपूर्ण लेखा विभागाची सुयोग्य साथ लाभत आहे. त्यामुळेच हे सर्वोत्तम आर्थिक पत मानांकन याही वर्षी लाभले आहे. अशाप्रकारे सातत्याने पत मानांकन मिळविणे ही सर्व नवी मुंबईकर नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट असून या मानांकनाबद्दल महापालिका आयुक्तडॉ.कैलास शिंदे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

          मागील आर्थिक वर्षात कर वसूलीची चांगली कामगिरी करण्यात आल्याने नवी मुंबई महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सक्षम राहिलेली आहे. या कालावधीत थकीत मालमत्ताकर धारकांना दिलासा देणारी ‘मालमत्ताकर अभय योजना’ प्रभावीपणे राबविण्यात आली. त्यालाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. मालमत्ताकर विभागाने आत्तापर्यंतचे सर्वोच्च 26 कोटीहून अधिक करवसूली केली. इतरही विभागांनी त्यांचे 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. विविध करांव्दारे प्राप्त होणा-या निधीमधूनच नागरी सेवासुविधांची पूर्तता करण्यात येत असल्याने नवी मुंबईकर नागरिकांना अधिक उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणे शक्य झाले. ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण’ तसेच माझी वसुंधरा अभियान यामध्येही नवी मुंबई महानगरपालिकेने उत्तम कामगिरीचे सातत्य राखले आहे.

          महापालिका आयुक्तांमार्फत महानगरपालिकेच्या आर्थिक नियोजनाकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. करवसूलीमध्ये चांगली कामगिरी आणि नागरी सुविधांच्या योग्य बाबींवरच खर्च असे सुयोग्य धोरण अवलंबिल्याने तसेच ई गव्हर्नन्सची प्रभावी अंमलबजावणी करीत ई ऑफिस कार्यप्रणाली राबविल्याने कामकाजात गतिमानतेसोबतच पारदर्शकता आलेली आहे. लेखा विभागामार्फत ‘होस्ट टू होस्ट’ प्रणालीव्दारे देयके व रक्कमा अदायगी होत असून महानगरपालिकेचे कोणतेही पेमेंट पुरवठादाराच्या थेट बँक खात्यात जमा होत आहे. यामधून कामकाजात पारदर्शकता आली आहेच शिवाय कामकाजही पेपरलेस व गतीमान झाले आहे. कंत्राटदारांची अदायगी व अधिकारी, कर्मचारी यांचे पगारही वेळेवर होत आहेत. त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेकडे महाराष्ट्र शासन, एम.एम.आर.डी.ए., एम.आय.डी.सी. यापैकी कोणाचेही कर्ज, व्याज अथवा कर थकीत नाही.

          या सा-यांचे फलित म्हणजे हे पत मानांकन असून यापुढील काळातही महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमेच्या तुलनेत नागरिकांना उपयोगी अशा नागरी सुविधांवरील योग्य खर्च ही पध्दत कायम राखली जाणार आहे. त्यामुळे “इंडिया रेटींग अँड रिसर्च” या नामांकीत संस्थेमार्फत “इंडिया AA+ Stable” हे सातत्याने अकराव्या वर्षी लाभलेले पत मानांकन कायम राखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज आहे.

00000⁰

संबंधित पोस्ट

महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे आ. तरे यांनी घेतला जलवाहतुकीचा आढावा

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची दिव्यांग व अनाथ मुलांच्या काष्ठ कलाकृती प्रदर्शनाला भेट

निवडणूक मुक्त आणि निर्भय वातावरणात पार पडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करा – राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे निवडणूक पूर्वतयारी संबंधी अमरावती विभागाचा घेतला आढावा

महापारेषणच्या विविध मंजूर प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करावीत- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळ पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक संकटात – प्रतिदिन सहा कोटींची तूट

vishwatmaklokswamivarta

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा  यास मद्रास उच्च न्यायालयाने  अंतरिम अटकपूर्व जामीन  मंजूर केला.