vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’च्या लाभार्थ्यांनी मुदत कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई प्रतिनिधी : मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरीता https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसी ची सुविधा 18 सप्टेंबर पासून दोन महिन्याच्या कालावधी करीता उपलब्ध करण्यात आली आहे. ई-केवायसी ची प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ असून आत्तापर्यंत अनेक लाभार्थ्यांनी ई-केवायसी ची प्रकिया यशस्वी पूर्ण केली आहे . इतर लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई-केवायसी प्रक्रियेबाबत येणाऱ्या समस्यांवर उपाययोजनाबाबत आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी माध्यमातून आधार प्रमाणीकरण केले जात आहे. ही प्रक्रिया अतिशय सोपी व सुलभ असून, महिला स्वत:च्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया कमी वेळात पुर्ण करू शकतात. ज्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही त्यांनी 18 नोव्हेंबर पर्यंत ही प्रक्रिया पुर्ण करावी.

०००

संबंधित पोस्ट

शासकीय कर्करोग रुग्णालयातील ट्रू बीम लिनियरॲक्सलरेटर उपचार प्रणालीचे लोकार्पण

मराठी भाषा विभागासह अधिनस्त कार्यालयांची सात संकेतस्थळे नव्या स्वरूपात कार्यान्वितनव्या संकेतस्थळांचा लाभ घेण्याचे मराठी भाषा विभागाचे आवाहन

रुग्णसेवेचा विचार करून डॉक्टरांनी संप मागे घ्यावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक जाहीर; १८ जून रोजी मतदान, तर २२ जूनला होणार मतमोजणी..

बहुचर्चित “उदयपूर फाइल्स’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करणार- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

vishwatmaklokswamivarta