vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नमुंमपा शाळेतील माजी विद्यार्थिनी पश्चिम विभागाची कर्णधार फुटबॉलपटू राबिया शेख यांचा आयुक्तांनी केला विशेष सत्कार…

नमुंमपा शाळेतील माजी विद्यार्थिनी पश्चिम विभागाची कर्णधार फुटबॉलपटू राबिया शेख यांचा आयुक्तांनी केला विशेष सत्कार…

 

        नवी मुंबई प्रतिनिधी  नवी मुंबई महानगरपालिका शाळा क्र.36, कोपरखैरणेगाव येथील माजी विद्यार्थिनी कु.राबिया सागर शेख हिची ‘इंडिया खेलो फुटबॉल लीग – 2025 (IKF-4)’ साठी पश्चिम विभागाकडून संघाची कर्णधार म्हणून नुकतीच निवड झाली आहे. ही बाब नवी मुंबई महापालिकेसाठी अत्यंत अभिमानास्पद व गौरवास्पद आहे.

या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी तिचे अभिनंदन करीत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार, शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे, शिक्षण अधिकारी श्रीम. अरुणा यादव, क्रीडा अधिकारी श्री. रेवप्पा गुरव उपस्थित होते.

कु. राबिया शेख हिने यापूर्वीही विविध स्पर्धांमध्ये उज्ज्वल यश संपादन केले आहे. यामध्ये – (1) सुब्रतो रॉय फुटबॉल कप – उपविजेतेपद, (2) DSO फुटबॉल स्पर्धा – विजेतेपद, (3) मुंबई फुटबॉल लीग – विजेतेपद, (4) TFC ठाणे फुटबॉल लीग – विजेतेपद – अशा अनेक स्पर्धांचा समावेश आहे.

तिला फुटबॉल प्रशिक्षक श्री.रोहन जगताप, श्री.ज्ञानेश्वर घुगे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले आहे. तसेच संघ व्यवस्थापक श्री.योगेश सुर्वे, श्री.कुणाल कोषटवार, सौ.अश्विनी सावले यांचेही वैयक्तिक मार्गदर्शन लाभले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी श्री.रेवप्पा गुरव व शिक्षक श्री.प्रशांत गाडेकर यांचेही उत्तम सहकार्य व मार्गदर्शन मिळाले आहे. नमुंमपा शाळा क्रमांक 36 कोपरखैरणे गाव येथील विद्यार्थ्यांसाठी राबियाने प्रेरणादायी कामगिरी केली असून तिचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

 

संबंधित पोस्ट

जी.डी.सी. अँड ए परीक्षेचे अर्ज करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत मुदत..

vishwatmaklokswamivarta

१९९३ च्या दंगलीतील ३२ वर्षांपासून फरार आरोपीला अखेर अटक

vishwatmaklokswamivarta

बंजारा समाजाच्या मागणीला शिवसेनेचा पाठिंबा- जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर

vishwatmaklokswamivarta

बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय अभियानाचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

मुंबई महानगरपालिकेत आमदार संतोष बांगर यांचा ‘धडाका’; सायन-कोळीवाड्यात शिंदे सेनेचा प्रचार सुसाट!मुंबईतही आमदार बांगरांची ‘धडाकेबाज’ एन्ट्री; सायन-कोळीवाड्यात स्टार प्रचारक म्हणून झंझावाती प्रचार..

vishwatmaklokswamivarta

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ४३० कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण

vishwatmaklokswamivarta