vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई व पुणे विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याबाबत बैठक

मुंबई व पुणे विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारण्याबाबत बैठक..

 

मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील अनेक आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी दुर्गम भागातून मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये येतात. या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक परिसरात राहण्याची सोय व्हावी यासाठी मुंबई व पुणे विद्यापीठाच्या परिसरात वसतिगृह उभारण्यासंदर्भात आढावा बैठक आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

बैठकीस मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, ठाणे अप्पर आयुक्त गोपीचंद कदम, सहसचिव मच्छिंद्र शेळके, मुख्य अभियंता उज्वल डाबे उपस्थित होते.

आदिवासी विकास मंत्री डॉ. वुईके म्हणाले, आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभाग नेहमीच प्रयत्नशील असतो. अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपला जिल्हा सोडून इतर जिल्ह्यात जात असतात. या वसतीगृहांचा लाभ केवळ विद्यापीठातीलच नव्हे तर विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांना सुरक्षित व परवडणाऱ्या निवासाची सोय उपलब्ध होणार आहे. आगामी काळात राज्यातील इतर प्रमुख विद्यापीठांच्या परिसरातही अशाच प्रकारच्या वसतीगृह सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आदिवासी समाजाचा इतिहास आणि संस्कृती पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रमुख विद्यापीठामध्ये आदिवासी अध्ययन व संशोधन केंद्र सुरू करण्यासंदर्भातील प्रस्ताव असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

 

0000

संबंधित पोस्ट

देशातील सर्वात मोठी सोलर इकोसिस्टीम नागपुरात; उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांचा उद्योजकांसोबत संवाद

vishwatmaklokswamivarta

पुणे विभागाची मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक संपन्न मान्सूनच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी समन्वयाने समन्वयाने काम करा- प्रभारी विभागीय आयुक्त कविता द्विवेदी

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात 16 मेपासून घरयादी व घरगणना होणार- निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे- 14 जूनपर्यंत चालणार कार्यवाही – प्रगणकांना परिपूर्ण माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन

एआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर,आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व डिजिटल मिशनच्या राष्ट्रीय ‘चिंतन शिबिरा’चे उद्घाटन

🎖️ ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते मागांती मुरली मोहन यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर.

नीट परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी