vishwatmaklokswamivarta
Breaking News
अध्यात्म

श्री गणपती बाप्पा मोरया !श्री गणेश जयंती माहिती व जन्म कथा माहिती

*श्री गणपती बाप्पा मोरया !**श्री गणेश जयंती माहिती व जन्म कथा माहिती—*

अध्यात्मिक वार्ता

 *गुरूवार दिनांक २२-०१-२०२६ रोजी माघ शुद्ध चतुर्थीस श्री गणेश जंयती आहे.**आपणा सर्वांना श्री गणेश जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा !*  *या दिवशी श्री गणपतीची षोडशोपचारे महापूजा व महाभिषेक करुन श्री गणपतीस तिळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवतात. श्री बुध्दिच्या देवताचे श्री गणपतीचे चरित्र वाचून आपले जीवन सार्थक करूया.*

*परिवार माहिती :- श्रीगणपती देवता**वाहन: उंदीर**शस्त्र: पाश, अंकुश, परशु, दंत**वडील: देव श्री महादेव**आई: देवी श्री पार्वती**पत्नी: देवी ऋद्धी, देवी सिद्धी**पुत्र: शुभ, लाभ*

*भाऊ: श्री कार्तिकेय**वहिनी: देवसेना देवी**बहिणः अशोकसुंदरी**सासरे: विश्वकर्मा**सासु: भुवना देवी*

*श्री गणपतीची अन्य नावे/ नामांतरे— ब्रह्मणस्पती, मयुरेश्वर, लंबोदर, वक्रतुंड, विनायक, विघ्नेश्वर, विघ्नहर, शूर्पकर्ण.**श्री गणपतीची बारा नावे* *१.वक्रतुंड २. एकदंत ३.कृष्णपिंगाक्ष ४. गजवक्त्र ५.लंबोदर ६.विकट ७.विघ्नराजेंद्र ८.धूम्रवर्ण ९.भालचंद १०.विनायक ११.गणपती १२.गजानन**(मंत्र –ॐ गं गणपतये नमः)**नामोल्लेख गणेश पुराण, मुद्गल पुराण*

*तीर्थक्षेत्रे अष्टविनायक श्री गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता,विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे.**

*नावे:-**पुराणांमध्ये गणपती हा शिवहर, पार्वतीपुत्र या नावांनी व शंकरपार्वतींचा मुलगा असल्याचे सांगितले जाते. श्री गणपतीला इतर काही नावे आहेत – माघ शुक्ल चतुर्थी व भाद्रपद शुक्ल चतुर्थी असा दोनदा जन्म झाल्याने द्वैमातुर नावानेही ही देवता ओळखली जाते. या देवतेस अग्रपूजेचा मान असतो. हिंदू धर्मग्रंथात या देवतेची वर्णने स्थलपरत्वे बदलत असली तरी हत्तीचे मुख आणि मनुष्याचे शरीर असलेली देवता हे वर्णन समान आहे. या देवतेचे वाहन काही ठिकाणी उंदीर तर काही ठिकाणी सिंह सांगितले आहे.पुराण व साहित्यात गणपतीचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. गणपती हा महाभारत या ग्रंथाचा लेखनिक होता. भारतात सर्वत्रच गणेशाची पूजा प्रचलित आहे. विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणावर पूजा व उत्सव होतात. गणेशाचा उपासक संप्रदाय गाणपत्य नावाने ओळखला जातो. हा संप्रदाय गणेशाची मयूरेश्वर नावाने पूजा करतो.*

 *( *श्री गणेश गायत्री मंत्र असा आहे –**“ एकदंताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्* ”)**सवाहन गणेश, कर्नाटकातील तळकाडूच्या वैद्येश्वर मंदिरातील शिल्प.*

*नावांची व्युत्पत्ती.**गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे. गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणून गणपती असेही नाव या देवतेस आहे. महाराष्ट्रात हे नाव विशेष लोकप्रिय आहे. विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात. हे नाव ‘गणपती’ नावाशी संबंधित आहे. विनायक या शब्दाचा अर्थ वि म्हणजे विशिष्टरूपाने जो नायक (नेता) आहे तो. याच अर्थाने गणाधिपती नावही प्रचारित आहे. हेरंब हे नाव देशीय प्राकृत शब्द हेरिम्बो पासून आले आहे. हेरंब म्हणजे दीनजनांचा तारणकर्ता होय. वक्रतुण्ड, एकदंत, महोदय, गजानन, विकट आणि लंबोदर ही गणपतीची देहविशेष दर्शविणारी नावे आहेत.**वक्रतुण्ड म्हणजे ज्याचे तुण्ड (तोंड) वक्र वा वाकडे आहे तो. गणपतीच्या सोंडेमुळे चेहरा थोडासा वक्र दिसतो त्यामुळे हे नाव. एकदंत म्हणजे ज्याला एक दात आहे तो. गणपतीस एक दात असण्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात. प्रथम कथेनुसार, परशुरामाने युद्धात गणपतीचा एक दात उपटला. दुसर्‍या कथेनुसार कैलास पर्वतावर गणपतीने रावणास अडवले म्हणून रावणाने गणपतीचा एक सुळा मोडला. आणखी एका कथेनुसार खेळाखेळातील लढाईत कार्तिकेयाने गणपतीचा एक दात भग्न केला. महोदर आणि लंबोदर शब्दांचा अर्थ अनुक्रमे महा म्हणजे मोठे उदर (पोट) असणारा व लंब वा लांबडे उदर (पोट) असणारा असा आहे. ही दोन्ही नावे गणपतीचे स्थूलत्व दाखवतात. विघ्नराज वा विघ्नेश्वर शब्दाचा अर्थ सकल विघ्न वा बाधांचा अधिपति असा आहे. पुराणात सर्वत्र गणपतीचा विघ्नाधिपती म्हणून उल्लेख आढळतो. सकल बाधांचा अधिपति व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस हे नाम प्राप्त झाले.*

*भगवान श्री गणपती बाप्पा यांच्या आशिर्वादाने आपणा सर्वांचे कल्याण होवो, आपणा सर्वांना उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभो, आपली सर्व विघ्ने व संकटे दूर होऊन आपणा सर्वांना आपल्या क्षेत्रात सुयश लाभो, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, भरभराट लाभो आणि आपणा सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवो हिच श्री गणपती चरणी प्रार्थना !* *गणपती बाप्पा मोरया !* *मंगलमूर्ती मोरया !**शुभम भवंतु !*

संबंधित पोस्ट

रुद्राभिषेकाचे फायदे –

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त संत निरंकारी मिशनचा कार्यक्रम

जीवनात गुरुला खूप मोठे महत्व-सुनिताजी चावला

आज नरिमन नगर येथे अक्कलकोट स्वामी महाराज प्रगट दिन निमित्त मंदिरात भक्तांनी घेतले दर्शन घेतला तीर्थप्रसादाचा लाभ झाला कार्यक्रम संपन्न

देशाच्या स्वातंत्र्यदिना बरोबर निरंकारी मिशनने साजरे केलेआत्मिक जागृतीचे पावन पर्व : मुक्ती पर्व भक्तीमध्ये स्वातंत्र्याची मुक्ती- निरंकारी राजपिता रमितजी

💐 *”कीर्तनमंदाकिनी चा सूर हरपला”* दि २४ डिसेंबर २०२५ सुप्रसिद्ध जेष्ठ कीर्तनकार ह.भ.प.मंजुश्रीताई खाडिलकर अनंतात विलीन*

vishwatmaklokswamivarta