vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

ससून रुग्णालयात जागतिक थॅलेसेमिया दिन उत्साहात साजरा

ससून रुग्णालयात जागतिक थॅलेसेमिया दिन उत्साहात साजरा

आरोग्य प्रतिनिधी-ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या बालरोग विभागात सोफोश सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ८ मे रोजी जागतिक थॅलेसेमिया दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात थॅलेसेमिया बालरुग्णांच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सहभागी बालरुग्णांना आकर्षक भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आलाया कार्यक्रमास ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव, मेट्रन श्रीमती केदारी, समाजसेवा अधीक्षक विभागाचे विभागप्रमुख डॉ. शंकर मुगावे, संबंधित विभागातील डॉक्टर, परिचारिका, सुमारे ५० थॅलेसेमिया बालरुग्ण, सोफोश संस्थेचे पदाधिकारी तसेच रुग्णांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लप्पा जाधव व मेट्रन श्रीमती केदारी यांनी मार्गदर्शन करताना थॅलेसेमिया रुग्णांसाठी समाजाने संवेदनशीलतेने पुढे येण्याचे आवाहन केले. तसेच थॅलेसेमिया रुग्णांना नियमित रक्तपुरवठ्याची आवश्यकता लक्षात घेता अधिकाधिक नागरिकांनी ऐच्छिक रक्तदानात सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले

डॉ. शंकर मुगावे यांनी थॅलेसेमिया आजार, त्यावरील उपचार तसेच ऐच्छिक रक्तदानाचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. जनकल्याण समितीमार्फत करण्यात आलेल्या २४ हजार नागरिकांच्या रक्त तपासणी सर्वेक्षणात सुमारे ३ टक्के नागरिकांमध्ये थॅलेसेमियाचे प्रमाण आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत “थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र अभियान” राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्यभरातील महाविद्यालये, सामाजिक संस्था, सत्संग मंडळे आदी विविध स्तरांवर जनजागृती, प्रचार-प्रसार, प्रबोधन व रक्त तपासणी मोहिमा राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.या अभियानामध्ये शासनासोबत जनकल्याण समिती आणि भारतीय रक्तविज्ञान शास्त्र संस्था (ISBTI) यांचा प्रमुख सहभाग असणार असल्याचेही त्यांनी नमूद केले. थॅलेसेमिया रुग्णांच्या पालकांनी स्वतः जनजागृतीचे माध्यम बनून समाजात जागरूकता निर्माण करावी तसेच तरुणांना ऐच्छिक रक्तदानासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही डॉ. मुगावे यांनी केले. “ऐच्छिक रक्तदान ही आजची काळाची गरज आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

00्00

0

संबंधित पोस्ट

पल्स पोलिओ मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी

हिंद-दी-चादर’ शहिदी समागम कार्यक्रमानिमित्त 10 ते 25 फेब्रुवारी कालावधीतनवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विशेष आरोग्य ‍शिबीरांचे आयोजन 

vishwatmaklokswamivarta

निक्षय मित्र बनुया, लातूर जिल्हा क्षयरोगमुक्त करु या…!प्रत्येक ग्रामपंचायतींनी क्षयरुग्णांचे सामाजिक दायित्व घेण्याचे आवाहन

दिव्यांग बालकांकरीता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या सदस्य निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर*

दंत आणि नेत्र शिबीराचा अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घेतला लाभनवीन महाराष्ट्र सदनात शिबीर संपन्न..