vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

दंत आणि नेत्र शिबीराचा अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घेतला लाभनवीन महाराष्ट्र सदनात शिबीर संपन्न..

दंत आणि नेत्र शिबीराचा अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घेतला लाभनवीन महाराष्ट्र सदनात शिबीर संपन्न..

 

नवी दिल्ली प्रतिनिधी: कस्तुरबा गांधीस्थित महाराष्ट्र सदनात आयोजित दंत आणि नेत्र शिबीराचा लाभ महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी घेतला.नवीन महाराष्ट्र सदनात ‘द केयरींग टच’ च्या सहकार्याने आज दंत आणि नेत्र तपासणीचे एक दिवसीय शिबीर महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांच्या मार्गदर्शनातून आयोजित करण्यात आले.याअंतर्गत महाराष्ट्र सदन, महाराष्ट्र परिचय केंद्र, बांधकाम विभाग, विद्युत विभाग,महाराष्ट्र सुरक्षा रक्षक तसेच सदनातील अन्य आस्थेपनेवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तसेच त्यांच्या कुटूंबियांनीचीही नेत्र आणि दंत तपासणी मोफत करण्यात आली. यासबंधित काही समस्या असल्यास त्याची संपूर्ण माहिती तज्ञाव्दारे देण्यात आली.द केयरींग टच च्यावतीने दंत चिक‍ित्सक डॉ. क्षितीजा भक्ते, दंत सहायक सुमीत, नेत्र रोग तज्ञ शोभा या तपासणीसाठी तर शिबीराच्या प्रमुख श्रीमती श्वेता, एचआर प्रमुख श्रीमती कवीता या शिबीराच्या व्यवस्थापनासाठी या उपस्थित होत्या.

या शिबीराचा लाभ सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार, सारीका शेलार, स्मिता शेलार या अधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी दंत आणि नेत्र तपासून करून घेतली.

संबंधित पोस्ट

रक्तदान शिबिर मालिकेत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ⁠112 पिशव्या रक्त संकलित- दोन शिबिरातून एकूण 213 पिशव्या रक्त संकलन

vishwatmaklokswamivarta

कर्करोग तपासणी आणि जनजागृती शिबिर संपन्नबदलापूरमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

कुष्ठरोगविषयक संदेश देणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद..

vishwatmaklokswamivarta

अमृत मानस मित्र’ प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारेमानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची “अमृत” मार्फत सुवर्णसंधी!

विविध उपक्रमांतून नवी मुंबई महानगरपालिकेची जागतिक क्षयरोग दिनी व्यापक जनजागृती

स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान राबविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta