vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकन प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी: भारत सरकारतर्फे प्रदान करण्यात येणारे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी मानाचे पुरस्कार आहेत. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय आणि समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा गौरव या पुरस्कारांद्वारे केला जातो. प्रजासत्ताक दिन २०२७ निमित्त जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी राज्यातील पात्र व्यक्तींची नामांकने मागविण्यात आली आहेत

गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांचा उद्देश विविध क्षेत्रांतील असामान्य योगदानाची दखल घेणे हा आहे. कला, साहित्य व शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्र, समाजकार्य, विज्ञान व अभियांत्रिकी, नागरी सेवा, व्यापार व उद्योग आदी क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य अथवा सेवेसाठी हे पुरस्कार प्रदान केले जातात

जिल्ह्यातील पात्र व्यक्तींची पद्म पुरस्कार २०२७ साठी नामांकने विहित नमुन्यात भरून दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन सादर करावीत. नामांकन प्रस्ताव भारत सरकारच्या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे.

नामांकन प्रक्रियेबाबत अधिक माहिती तसेच ऑनलाइन अर्जासाठी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलला भेट द्यावी. जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींची नावे पुढे आणण्यासाठी नागरिक, संस्था आणि संघटनांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ‘सेवाखंड क्षमापित’ करण्याच्या ऐतिहासिक निर्णयामुळेआरोग्य सेवेत गुणात्मक वाढ होणार-सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर,150 वैद्यकीय अधिकाऱ्यांना ‘सेवाखंड क्षमापित’ पत्रांचे वितरण…

vishwatmaklokswamivarta

टंचाई काळात पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील शेवगाव – पाथर्डीच्या पाणीटंचाई निवारणासाठी २० कोटींचा निधी ; वांबोरी चारीच्या कामांना गती

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा २५ व २६ फेब्रुवारी रोजीचा दौरा कार्यक्रम

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना-मुदतवाढीची ती बातमी खोटी

पर्यावरणाच्या हितासाठी पीएनजी जोडणीस प्राधान्य द्यावे**जिल्हाधिकारी संतोष पाटील*

महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या मंत्रालयातील बैठकीत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा महत्त्वाचा निर्णय !*_*देवस्थानांच्या हडप केलेल्या जमिनींच्या सर्वेक्षणाचे; तसेच ‘ॲन्टी लँड ग्रबींग ॲक्ट’चा मसुदा तयार करण्याचे आदेश !*