vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त बुलढाण्यात ‘नेत्रदान-जीवनदान’ जनजागृती मोहीम

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त बुलढाण्यात ‘नेत्रदान-जीवनदान’ जनजागृती मोहीम

बुलढाणा, प्रतिनिधी : जिल्हा अंधत्व नियंत्रण कार्यक्रम, जिल्हा रुग्णालय बुलढाणा, आरोग्य विभाग जिल्हा परिषद बुलढाणा आणि विदर्भ ऑप्थल्मोलॉजिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक नेत्रदान दिनानिमित्त बुधवार, दि. १० जून २०२६ रोजी विशेष ‘नेत्रदान-जीवनदान’ जनजागृती मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे

हा कार्यक्रम सकाळी ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, संगम चौक, बुलढाणा येथे होणार असून समाजामध्ये नेत्रदानाबाबत जागरूकता निर्माण करणे आणि अधिकाधिक नागरिकांना नेत्रदानासाठी प्रेरित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

कार्यक्रमास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते, विदर्भ ऑप्थल्मोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शोन चिंचोले, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. जीवणे, डॉ. भिलावेकर, डॉ. तोडकर, समुपदेशक योगेश शिरसाट तसेच सौरभ हिवाळे आणि देवकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

नेत्रदानामुळे कॉर्नियल अंधत्व असलेल्या व्यक्तींना दृष्टी मिळण्याची संधी उपलब्ध होते. मृत्यूनंतर केलेले नेत्रदान अनेक अंध व्यक्तींच्या जीवनात प्रकाश निर्माण करून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत करते. वाढती गरज आणि उपलब्ध कॉर्नियांची मर्यादित संख्या यामधील दरी कमी करण्यासाठी जनसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले आहे.

या मोहिमेअंतर्गत जनजागृती रॅली, सार्वजनिक शिक्षण कार्यक्रम, नेत्रदान प्रतिज्ञा मोहीम, पोस्टर प्रदर्शन तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. “डोळे दान करा – दृष्टीची भेट द्या, आयुष्याला प्रकाश द्या” हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध असून जिल्ह्यातील नागरिकांनी या उदात्त कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते100 क्षय रुग्णांना पोषण आहार किटचे वाटप

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम मोहीम शनिवारपासून,पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत कळंबीला जिल्हास्तरीय कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

दिव्यांग बालकांकरीता आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आषाढी वारीतील ३.८३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना आरोग्य सेवा

स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान;जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अलिबाग वैद्यकीय महाविद्यालयात विविध सामाजिक उपक्रम