vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसायस्थानिक बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (#बार्टी) तर्फे राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य योजना जाहीर – 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (#बार्टी) तर्फे राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य योजना जाहीर –

मुंबई प्रतिनिधी-डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (#बार्टी) तर्फे राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २०२४ मध्ये उत्तीर्ण होऊन मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना या योजनेअंतर्गत एकरकमी दहा हजार रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. मुलाखतीसाठी पात्र झालेल्या उमेदवारांनी यांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा असावा. उमेदवार १३ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या ०५४/२०२५ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग अभियांत्रिकी मुख्य परीक्षा उत्तीर्ण असावा. अर्जाची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून अर्ज करण्यासाठी बार्टीच्या https://forms.gle/nkVisRqmndp1qpAM9 या लिंकवर फॉर्म आणि आवश्यक माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आवश्यक कागदपत्रांसह अर्ज २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत भरण्याची मुदत देण्यात आली असून अधिक माहितीसाठी 020-26333330/26333339 येथे संपर्क करावा.

संबंधित पोस्ट

समृद्ध भविष्याच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र गुंतवणूकदारांचे यशस्वी डेस्टिनेशन-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस· इंडो- अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्स राष्ट्रीय परिषद २०२६

शहापूरच्या माळरानावर ग्रह-नक्षत्रांची फुले फुलली ठाणे जिल्ह्यातील पहिल्या तारांगणाचे शहापूरला उद्घाटन …

मुंबई उभी करणारे लाखो शहरी कामगार आजही असुरक्षित, असंघटित आणि शोषणात्मक परिस्थितीत जीवन जगत आहेत. स्वच्छता कामगार, घरकामगार, ऑटो-रिक्षा चालक, फेरीवाले आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना सरकार मूलभूत हक्क, सामाजिक सुरक्षा आणि सन्मानजनक जीवनापासून वंचित ठेवत असल्याचा गंभीर आरोप मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन

महाराष्ट्र सामाजिक विकास ट्रस्ट आणि सेवा संस्था बालविवाहाविरुद्ध मोहीम राबवणार, सहकार्यासाठी जिल्हा प्रशासनास आवाहन

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून उद्योजकांनाव्याज परताव्यासोबतच मिळणार व्यवसाय प्रशिक्षण

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे शुभारंभ.

vishwatmaklokswamivarta