vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पिंपरखेड च्या साबळे कुटुंबियांच्या घरी राज्यपालांनी घेतला भोजनाचा आस्वाद

पिंपरखेड च्या साबळे कुटुंबियांच्या घरी राज्यपालांनी घेतला भोजनाचा आस्वाद

 

नाशिक, प्रतिनिधी : राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी आज सायंकाळी दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड या गावातील साबळे कुटुंबाच्या घरी नागलीची भाकरी, उडीदाचे वरण आणि हरभऱ्याच्या भाजीचा आस्वाद घेतला. राज्याच्या प्रथम नागरिकाने आपल्या घरी भोजनाचा आस्वाद घेतल्याने साबळे कुटुंबीय भारावले होते.

हिरामण शंकर साबळे यांचे गावात साधे घर आहे. त्यांच्या घरी राज्यपाल महोदय जेवणाला येणार, अशी माहिती मिळताच त्यांनी तयारी सुरू केली. घराला रंग रंगोटी केली. प्रवेशद्वाराच्या भिंती वारली चित्रकलेने साकारली होती. साबळे कुटुंबातील गोजरताईने राज्यपालासांसाठी लाल, पांढरी नागली आणि बाजरीच्या भाकरी, अळू आणि वर्कण कंदाची भाजी, हरभराची भाजी, उडीदाचे वरण तयार केले होते. राज्यपाल श्री. देवव्रत यांच्यासमवेत विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे यांच्यासह साबळे कुटुंबातील सदस्यांनी भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी राज्यपाल श्री. देवव्रत यांनी स्थानिक पिके, जीवनमान या विषयी माहिती घेतली.

राज्यपाल श्री. देवव्रत यांनी आमच्या घरी जेवण केले. ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे, असे साबळे कुटुंबातील सदस्यांनी यावेळी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

खाद्य सुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदूंच्या सण-उत्सवांना लक्ष्य का? नियम सर्वांना समान लागू करा! हिंदु जनजागृती समिती*आधी राज्याच्या मुख्यालयातील अन्नाचा दर्जा कधी सुधारणार ?

रोहा येथील शिवसृष्टीचे मंत्री कु. अदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

गुंतवणूकदार उद्योजकांचे कोकण विभागात स्वागत..उद्योजकांसाठी पोषक वातावरण निर्मितीसाठी प्रशासन कटिबद्ध-विभागीय आयुक्त डॉ.विजय सुर्यवंशी

परभणी जिल्ह्यातील जलजीवनमिशन अंतर्गत अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे निर्देश ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले.

जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान कर्करोग तपासणी मोहीम कॅन्सर व्हॅनद्वारे होणार मोफत तपासणी

गडचिरोलीच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध- सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल*प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta