vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन सोहळा साकेत पोलीस मैदानावरउपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन सोहळा साकेत पोलीस मैदानावरउपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

ठाणे, प्रतिनिधी :- भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ सोमवार, दि.26 जानेवारी 2026 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साकेत पोलीस मैदान येथे सकाळी 9.15 वा.संपन्न होणार आहे.

   ध्वजारोहणाच्या वेळी राष्ट्रीय/समारंभीय पोषाख परिधान करण्यात यावा. ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभात निमंत्रितांना सहभागी होता यावे यासाठी या दिवशी सकाळी 8-30 ते 10 वाजेदरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय किंवा अशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहणाचा समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8-30 पूर्वी किंवा सकाळी 10 वाजेनंतर करावा.

    ध्वजसंहितेतील सर्व नियमांचे व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर ध्वजसंहितेच्या तरतूदीमध्ये नमूद केल्यानुसारच करावा. खराब झालेले माती लागलेले राष्ट्रध्वज गोणी किंवा कपड्यामध्ये व्यवस्थित बांधून शिवून बंद करावेत. अशासकीय संस्था, इतर संघटनांनी तसेच नागरिकांनी हे राष्ट्रध्वज तहसिल कार्यालयात सुपूर्द करावेत. राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखावा.

   भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यास जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक, आणीबाणी सत्याग्रही, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, नागरिक, शासकीय अधिकारी कर्मचारी, विद्यार्थी अशा सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

000000000

संबंधित पोस्ट

जालना जिल्हा ग्राहक पंचायतच्या अध्यक्षपदी मोहन इंगळे यांची फेरनिवड संघटकपदी शिवाजी वाघ तर सचिवपदी सुनील मावकर

अनुकंपा नियुक्तीसाठी दिवंगत कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसदारांचा परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा   – शिक्षणाधिकारी (योजना) महेश धोत्रे

प्रशासकीय कामकाजात संवेदनशीलता आणि प्रामाणिकपणा जपण्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांचे आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा; उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

महाड येथील अमृतपेठ थेट स्वदेशी बाजारपेठला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; मुंबई, महाराष्ट्राला अधिक शक्ती देणारा अर्थसंकल्प प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta

काँग्रेस देशभर आंदोलन करून मोदी सरकारच्या वारंवार मांडणाऱ्या खोटारड्या भूमिकेची पोलखोल करणार  अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कार्यकारणी सदस्य माजी मंत्री आरिफ (नसीम) खान यांची टीका …