vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

खानापूर-विटा प्रकल्पांतर्गत धोंडगेवाडी गावातील अंगणवाडी मदतनिस पदासाठी 24 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

खानापूर-विटा प्रकल्पांतर्गत धोंडगेवाडी गावातील अंगणवाडी मदतनिस पदासाठी 24 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सांगली, प्रतिनिधी : एकात्मिक बाल विकास सेवा योजना खानापूर-विटा प्रकल्पांतर्गत धोंडगेवाडी या महसूली गावातील अंगणवाडी क्रमांक 44 येथै अंगणवाडी मदतनिस हे मानधनी पद रिक्त आहे. या पदभरतीसाठी स्थानिक रहिवाशी व गुणवत्ताधारक पात्र महिलांनी त्यांचे अर्ज दिनांक 24 सप्टेंबर 2026 अखेर बाली विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना खानापूर-विटा कार्यालयात कार्यालयीन वेळेत साक्षांकित प्रतिसह समक्ष पोहोच करावयाचे आहेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे बाल विकास प्रकल्प अधिकारी खानापूर-विटा यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे.

अटी व शर्ती – .उमेदवाराचे वय दिनांक 24 सप्टेंबर 2026 रोजी वय 18 वर्षे पूर्ण व 35 वर्षाच्या आतील असावे. विधवा महिला उमेदवारासाठी वयोमर्यादा दिनांक 24 सप्टेंबर 2026 रोजी 18 वर्षे पूर्ण व 40 वर्षाच्या आतील राहील. अंगणवाडी सेविका / मदतनिस पदासाठी शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. महिला उमेदवार ही त्या गावची स्थानिक रहिवाशी असावी. या पदासाठी लहान कुटूंबाची अट लागू राहील., असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आआहे.

0000

0

संबंधित पोस्ट

जागतिक सृजनशील सहयोगात,भारताचे एक अभूतपूर्व पदार्पण वेव्हज बझार : 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यवसाय व्यवहारांची नोंद..

श्री गुरुगोबिंद सिंघजी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत महिलांसाठी प्रवेशाची सुवर्णसंधी

कौशल्य विकास केंद्राचा आज रोजगार मेळावा

vishwatmaklokswamivarta

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातर्फे मिरज येथेआपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मॉकड्रील

vishwatmaklokswamivarta

सिपेटच्या विविध अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास सुरुवात..

vishwatmaklokswamivarta

पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड’ अंतर्गत ₹३ लाखांपर्यंत अर्थसहाय्य 🐄💰