vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातर्फे मिरज येथेआपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मॉकड्रील

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातर्फे मिरज येथेआपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी मॉकड्रील

 

        सांगली प्रतिनिधी: अनेक कारखान्यांमध्ये धोकादायक आणि अति ज्वलनशील पदार्थांचे उत्पादन व साठवणूक केली जाते. या पदार्थांच्या उत्पादन व साठवणुकीसाठी वेगवेगळ्या पध्दती अवलंबल्या जातात. या पार्श्वभूमिवर आपत्कालीन परिस्थितीत करावयाच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने व जनजागृतीसाठी मिरज येथे मॉकड्रील घेण्यात आले. ही माहिती औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय, सांगलीचे सहाय्यक संचालक तथा स्थानिक अरिष्ट समूह सांगलीचे सदस्य सचिव प्र. अ. बोंदर यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.

  या प्रात्यक्षिक प्रसंगी मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, कोल्हापूर विभागाचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य सहसंचालक अ. मो. अवसरे, उपसंचालक अ. भि. खरमटल, सहायक संचालक प्र. अ. बोंदर, सु. भि एकल, सु. वि. सुतार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ आदि उपस्थित होते.

 ऑफसाईट मॉकड्रीलच्या प्रात्यक्षिकवेळी कंपनीतील ऑईल साठवणूक करत असलेल्या टाकीची गळती होवून त्याचे मोठ्या आगीमध्ये रुपांतर झाल्याचे दाखविण्यात आले. यावर आपत्कालीन परिस्थिती हाताळणाऱ्या टीमने यशस्वीपणे ही आग आटोक्यात आणून परिस्थिती पूर्ववत केली. यामध्ये कोणालाही इजा, नुकसान होणार नाही, याबाबत पूर्णत: काळजी घेऊन प्रात्यक्षिक पूर्ण करण्यात आले.

  मॉकड्रीलपूर्वी द इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. मिरजमध्ये स्थानिक अरिष्ट समुहाची बैठक झाली. बैठकीनंतर इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि. मिरज येथील कामगारांकरिता “करम सेफ्टी इक्विपमेंट” यांच्या मोबाईल डेमो व्हॅनव्दारे विविध वैयक्तिक सुरक्षा साधनांची माहिती देण्यात आली.

या प्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक भैरवनाथ पाटील, मिरज येथील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, लि. चे प्रतिनिधी, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना, साखराळे, में बी. जी. चितळे, कारखाना, समर्थ इंडस्ट्रीज, किर्लोस्कर ब्रदर्स लि. किर्लोस्करवाडी, शिमोगा केमीकल मिरज यांचे प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते

संबंधित पोस्ट

ऐतिहासिक निकाल: पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची तात्काळ स्थगिती! मंदिर महासंघ आणि वारकरी संघटनांच्या याचिकेला मोठे यश;मूर्तीचे पावित्र्य जपण्यासाठी धर्मशास्त्रीय भूमिकेचा विजय

वारणा धरणग्रस्तांना शेतीयोग्य जमिनींचे वाटप करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण होईपर्यंत नविन पदांना मान्यता नकोआमदार सुधाकर अडबाले यांचे मंत्र्यांना निवेदन

नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रात 35 ठिकाणी रविवारी विशेष स्वच्छता, सुशोभिकरण मोहीम..

श्री सेवागिरी प्रदर्शनात कृषि विभागाचा स्टॉल ठरतोय आकर्षण*

अन्न व औषध प्रशासनात दक्षता आणि गुप्त वार्ता विभाग स्वतंत्र करावे-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ

vishwatmaklokswamivarta