vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

कौशल्य विकास केंद्राचा आज रोजगार मेळावा

कौशल्य विकास केंद्राचा आज रोजगार मेळावा

व्यावसायिक प्रतिनिधी

: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मोहिमे’चे मंगळवार, दि. 16 सप्टेंबर 2025 रोजी आयोजन करण्यात आले आहे. शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर, डेपो रोड, जि. अमरावती येथे हा मेळावा होणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडल करिअर सेंटर अमरावती तसेच कोलब्रो गृप प्रा. लि. अमरावती, स्विगी अमरावती, कोअर प्रोजेक्ट अमरावती, जाधव गिअर्स अमरावती, सह्योग मल्टी स्टेट क्रेडीट सोसायटी प्रा. लि. अमरावती यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून प्रयत्न करण्यात येतो. या मेळाव्यात आस्थापना, कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी mahaswayam.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. यात ऑनलाईन सहभाग नोंदवून आपली रजिट्रेशनची प्रत काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित राहावे. याबाबत अडचणी असल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा amravatirojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो आणि आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या प्र.सहायक आयुक्त अभिषेक ठाकरे यांनी केले आहे.

संबंधित पोस्ट

उद्योजकांच्या पंखाना शासन बळ देणार -पालकमंत्री संजय शिरसाट जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत १२ हजार कोटींचे सामंजस्य करार, २१ हजार रोजगार निर्मिती

सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे 6 जूनला जिल्ह्यात ‘मेगा कृषी क्रेडिट आउटरीच कॅम्प’सर्व 45 शाखांमध्ये जागेवरच होणार कर्जवाटप

प्लेक्स कॉन्सिलच्या 70 वर्षांच्या कार्याचा गौरव भारत टिकाऊ प्लास्टिक उत्पादनात जागतिक नेता बनू शकतो: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासन आणि टोयोटा किर्लोस्कर यांच्यात सामंजस्य करार०००बिडकीन येथे जि.प.केंद्रीय प्राथमिक शाळेच्या विकासासाठी पुढाकार

नवतेजस्विनी प्रकल्पः ‘माविम’बचतगटांच्या उत्पादनांचे दि.७ पासून प्रदर्शन

तृतीयपंथीयांसाठी बीजभांडवल योजना;३० मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहनस्वयंरोजगारासाठी कर्ज उपलब्ध