vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

नवतेजस्विनी प्रकल्पः ‘माविम’बचतगटांच्या उत्पादनांचे दि.७ पासून प्रदर्शन

नवतेजस्विनी प्रकल्पः ‘माविम’बचतगटांच्या उत्पादनांचे दि.७ पासून प्रदर्शन

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांचे जिल्हास्तरीय प्रदर्शन व विक्री मेळावा शुक्रवार दि.७ ते रविवार दि.९ मार्च दरम्यान जिल्हा परिषदेच्या मैदानावर होणार आहे, अशी माहिती माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड यांनी दिली आहे.

महिला आर्थिक विकास महामंडळ मार्फत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत शुक्रवार दि.७ ते रविवार दि.९ मार्च दरम्यान जिल्हा परिषद मैदान, औरंगापुरा, छत्रपती संभाजीनगर येथे बचत गटातील महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूचे भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सव आयोजित करण्यात आले आहे. या जिल्हा स्तरीय भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्यात ५० पेक्षा जास्त स्टॉल्स लावण्यात येणार आहे. तसेच दररोज विविध विषयावर परिसंवाद व बचत गटातील उद्योजक महिलांच्या मनोगताचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बचत गटातील उद्योजक महिलांचा सन्मान केला जाणार आहे. सर्व प्रकारचे डाळ, तांदळाचे पापड, शेवाया, शोभेच्या वस्तू, तूप, लोणची व इतर वस्तू / पदार्थ या प्रदर्शनात मांडण्यात येतील. या वस्तू विक्रीसाठीही उपलब्ध असतील.या मेळाव्यास भेट द्यावी तसेच बचत गटांनी उत्पादीत केलेल्या साहित्य व वस्तुंची खरेदी करावी,असे आवाहन जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड यांनी केले आहे.०००००

संबंधित पोस्ट

शून्यातून विश्व निर्माण करणारी ‘केक क्वीन’: सातारच्या स्मिता बेंद्रे*

अमृत आणि एम.सी.ई.डी.मार्फत मोफत प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन..

vishwatmaklokswamivarta

भूतपूर्व सैनिक व भूतपूर्व महिला वन कर्मचाऱ्यांसाठी 136 इन्फंट्री बटालियन (टीए) इको महारमध्ये भरती मेळावा

रायगड आणि आसपासच्या भागांसाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी …

vishwatmaklokswamivarta

खाजगी नोकरी इच्छुकांसाठी सुवर्णसंधी; बुलढाण्यात 13 एप्रिलला प्लेसमेंट ड्राइव्ह

नमो शेतकरी योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित· राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात,१८९२.६१ कोटी रुपये जमा..

vishwatmaklokswamivarta