vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

आणीबाणी मानधन योजनेमध्ये सुधारणा* अर्ज करण्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत

आणीबाणी मानधन योजनेमध्ये सुधारणा* अर्ज करण्यासाठी 24 नोव्हेंबरपर्यंत मुदत

 अमरावती, प्रतिनिधी : आणीबाणीच्या काळात कारावास भोगला आहे, त्यांच्यासाठी मानधन योजनेमध्ये सुधारणा करण्यात येत आहे. त्यानुसार 24 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवीन निर्णयानुसार, ज्या आणीबाणी धारकांनी यापूर्वी योजनेचा लाभ घेतलेला नाही, त्यांना नव्याने अर्ज सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. अर्जदारांनी १५ सप्टेंबर २०१८ रोजीच्या शासन पूरक पत्रासोबत असलेल्या परिशिष्ट ‘ब’ मधील अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.

तसेच आणीबाणीच्या काळात कारावास भोगलेली व्यक्ती २ जानेवारी २०१८ पूर्वी हयात नसेल, तर त्यांच्या पश्चात हयात असलेले पती किंवा पत्नी मानधनासाठी अर्ज दाखल करू शकतात. आणीबाणी मानधन योजनेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २४ नोव्हेंबर २०२५ आहे. पात्र आणीबाणीधारक आणि त्यांचे हयात जोडीदार पती, पत्नी यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी केले आहे

000000

संबंधित पोस्ट

नसरापूर हत्या प्रकरणाच्या निकालावर उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले समाधान महाराष्ट्र कायद्याचे राज्य, इथे गुन्हेगारांना अभय नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात: एसडीआरएफ आणि एनडीआरए यंत्रणा सज्ज,नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

जालना शहर महानगरपालिकेतर्फे आज शहरातील वाढलेले अतिक्रमण काढणेकरिता अतिक्रमण तिस-या दिवशीही मोहीम…

vishwatmaklokswamivarta

मोताळा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला प्रशिक्षणार्थीना टूलकिट वाटप

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार; राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम मृद व जलसंधारण विभागाचा शासन निर्णय निर्गमित

पैसे नाही म्हणून शस्त्रक्रिया थांबणार नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गंभीर आजारांवरील उपचारांसाठी निधी हजारो रुग्णांनी घेतला ‘महाआरोग्य शिबिरा’चा लाभ