vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पेपरफूट, परीक्षा गैरप्रकार रोखणार संदर्भात केंद्राचा कायदा राज्यात लागू करणार

भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पेपरफूट, परीक्षा गैरप्रकार रोखणार संदर्भात केंद्राचा कायदा राज्यात लागू करणार

मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्रात विविध सेवाभरतींसाठी होणाऱ्या परीक्षा पद्धतीत सर्वसमावेशक, अधिक सुरक्षित आणि सर्वसंमतीने सुधारणांसाठी एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. या समितीने राज्यात प्रत्येक विभागात जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधत सर्वंकष सुधारणांबाबत अहवाल सादर करायचा आहे. वर्षा निवासस्थानी आयोजित या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित होते, त्यांनीही विविध उपयुक्त सूचना बैठकीत केल्या.

ही उच्चस्तरीय समिती सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेत राहणार असून राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते, माहिती-तंत्रज्ञान विभागाचे सचिव वीरेंद्र सिंग, पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉ. एन. रामास्वामी आणि नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांचा त्यात समावेश असेल. या समितीने प्रत्येक महसुली विभागात जाऊन विद्यार्थी, शिक्षण संस्थाचालक आणि संबंधित घटकांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घ्यायची आहेत. त्याआधारावर राज्यासाठीचे समग्र धोरण ठरविण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली. अलिकडेच केंद्र सरकारने पेपरफूट आणि परीक्षा गैरव्यवहारासंदर्भात संसदेत कायदा केला आहे. महाराष्ट्राचाही स्वतंत्र कायदा आहेच. तथापि संसदेने केलेला कायदा अधिक कठोर असल्याने तो महाराष्ट्रातही लागू करण्यासंदर्भात येणाऱ्या पंधरवड्यात प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, असेही निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

राज्यात किमान 25 हजार सुरक्षित क्लासरुम उभारण्यात याव्यात, असेही निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. या विविध परीक्षांमध्ये जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांचीही समन्वय भूमिका, इतर विविध देशांमधील परीक्षा पद्धती, विद्यमान प्रक्रिया आणि त्यातील विविध संभाव्य सुधारणा अशा अनेक विषयांवर यावेळी सांगोपांग चर्चा झाली. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि इतर वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

००००

संबंधित पोस्ट

श्रद्धेच्या नावाखाली विखारी विचारप्रणाली रुजवण्याचा प्रयत्न ! वारी भक्तीची, नास्तिकतावादाची नाही !

हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनच्या अमृतमहोत्सवानिमित्त दोन दिवसीय रिजनल कन्व्हेंशन· पर्यटन क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा..

vishwatmaklokswamivarta

सहकारी बँकांनी प्रगतीसाठी नवीन तंत्रज्ञान स्विकारणे आवश्यक -केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह

vishwatmaklokswamivarta

अनुदानित खतांची विक्री ई-पॉस प्रणालीद्वारे करणे बंधनकारक;२६ कृषी सेवा केंद्रांवर कारवाई; विक्री व साठ्यात आढळली तफावत

vishwatmaklokswamivarta

बी.ई.जी. मधून सेवानिवृत्त सैनिकांसाठी कोल्हापूर येथे 20 जुलैला संपर्क अभियान

अंबादास दानवे हे मराठवाड्याच्या मातीतील अस्सल नेतृत्व- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विधानपरिषदेत निरोप..