vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

सांगली, प्रतिनिधी : जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026 ची मतमोजणी दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजी एकूण 10 मतमोजणी केंद्रावर होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी, जिल्ह्यात शांतता रहावी तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित रहावी, याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हा दंडाधिकारी अशोक काकडे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मतमोजणी केंद्राच्या इमारतीपासून 200 मीटर सभोवतालच्या परिसरात पुढील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.

.या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना गटागटाने फिरण्यास, एकत्रित गटागटाने फिरणे व उभे राहण्यास मनाई केली आहे. तसेच झेरॉक्स मशीन, टेलिफोन बुथ, फॅक्स मशीन, ध्वनीक्षेपक यांचा वापर करण्यास मनाई केली असून मतमोजणी केंद्रात मोबाईल, पेजर वापरण्यासही मनाई केली आहे.हा आदेश निवडणूक कर्तव्य बजावीत असणाऱ्या शासकीय कर्मचारी / अधिकारी यांना लागू असणार नाही. हा आदेश दिनांक 9 फेब्रुवारी 2026 रोजीचे सकाळी 6 वाजल्यापासून ते संबंधित मतमोजणी केंद्रावरील प्रक्रिया संपेपर्यंत अंमलात राहील, असे आदेशात म्हटले आहे.

 तालुकानिहाय मतमोजणीचे ठिकाण पुढीलप्रमाणे – आटपाडी – दुसरा मजला हॉल, नवीन प्रशासकीय इमारत, तहसिलदार कार्यालय, आटपाडी. जत – जुने शासकीय धान्य गोदाम क्र. 2, नवीन प्रशासकीय इमारत, जत तहसिल कार्यालयाच्या समोर, जत. खानापूर – इनडोअर स्पोर्ट्स फॅसिलिटी सेंटर (Indoor Sports facility centre), बळवंत कॉलेज विटा. कडेगाव – औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), कडेगाव, कराड कडेगाव रोड, कडेगाव. तासगाव – शासकीय बहुउद्देशीय कक्ष, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दत्तमाळ, तासगाव. कवठेमहांकाळ – पुरवठा शाखा समोरील मोकळी जागा, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, कवठेमहांकाळ. पलूस – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तळमजला, न्यायालयाजवळ, पलूस. वाळवा – शासकीय धान्य गोदाम, बहे रोड, ईश्वरपूर. शिराळा – श्री गोरक्षनाथ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शिराळा. मिरज – शासकीय नवीन धान्य गोदाम, मिरज, वैरण बाजार, मिरज.

00000

संबंधित पोस्ट

मोफत कोचिंग योजनेच्या लाभासाठी 3 ऑगस्टपर्यंत नोंदणीचे आवाहन

राज्यात पुढील 5 दिवस पूर्व मान्सून पाऊस कोसळणार! अनेक जिल्ह्यात यलो अलर्ट जारी….

आखाती देशांत अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा यंत्रणा सतर्क; पालकमंत्री प्रकाश आबिटकर २३ नागरिक जिल्ह्यात सुखरूप परतले, ८० नागरिक दुबईहून ६ मार्च रोजी पोहोचतील

श्री गुरु गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ‘वीर बाल दिवस’ उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

वक्फ बचाव’ परिषद जालन्यात २८ जून रोजीप्रमुख इस्लामी विद्वान व नेते वक्फ कायद्यातील सुधारणांवर भाष्य करणार…

अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन समन्वयाने काम करावे-राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील 

vishwatmaklokswamivarta