vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

लोणीत रंगणार जलसंपदा विभागाचा ‘क्रीडाकुंभ’ राज्यभरातील अधिकारी – कर्मचारी दाखवणार खेळाचे कौशल्य७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान लोणी – शिर्डीत क्रीडा स्पर्धांचा थरार ; तयारी अंतिम टप्प्यात…

लोणीत रंगणार जलसंपदा विभागाचा ‘क्रीडाकुंभ’ राज्यभरातील अधिकारी – कर्मचारी दाखवणार खेळाचे कौशल्य७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान लोणी – शिर्डीत क्रीडा स्पर्धांचा थरार ; तयारी अंतिम टप्प्यात…

शिर्डी, प्रतिनिधी: – येत्या ७ ते ९ फेब्रुवारी दरम्यान लोणी व शिर्डीचे वातावरण क्रीडामय होणार आहे. निमित्त आहे, जलसंपदा विभागातर्फे आयोजित पाचव्या राज्यस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे ! ” खेळात सशक्त, सेवेत समर्थ ” हे ब्रीदवाक्य घेऊन होणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील अधिकारी व कर्मचारी खेळाच्या मैदानात आपले कसब पणाला लावणार आहेत.

​दरवर्षी होणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धांचे यजमानपद यंदा अहिल्यानगर जिल्ह्याकडे आले असून, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने स्पर्धेसाठी जय्यत तयारी केली आहे

दिमाखदार उद्घाटन सोहळा-स्पर्धेचे रणशिंग शुक्रवार, दि. ७ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता फुंकले जाईल. लोणी येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर हा उद्घाटन सोहळा पार पडेल. या वेळी अर्जुन पुरस्कार विजेते व भारतीय कबड्डी संघाचे माजी कर्णधार पंकज शिरसाठ, शिवछत्रपती पुरस्कार विजेती खो-खो पटू श्वेता गवळी व बेसबॉल पटू अक्षय आव्हाड खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी उपस्थित राहतील.

राज्याचे जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून जलसंपदा (विदर्भ, तापी,कोकण खोरे विकास महामंडळ) तथा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन उपस्थित राहणार आहेत. यावेळी विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव डॉ. संजय बेलसरे आदी उपस्थित राहणार आहेत.

तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात क्रिकेट, कबड्डी, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, बुद्धीबळ, कॅरम, अॅथलेटिक्स आणि जलतरण अशा विविध क्रीडा प्रकारांचा थरार अनुभवायला मिळेल. मंत्रालयीन कर्मचाऱ्यांपासून ते विविध महामंडळातील अधिकारी या स्पर्धेत सहभाग नोंदवणार आहेत. लोणीतील विखे पाटील महाविद्यालय आणि सैनिकी स्कूलच्या भव्य मैदानांवर हे सामने खेळवले जातील.

स्पर्धेचा पारितोषिक वितरण व समारोप सोहळा ९ फेब्रुवारीला शिर्डीच्या शासकीय प्रशिक्षण संस्थेत होईल. या कार्यक्रमासाठी नामवंत धनुर्विद्या प्रशिक्षक डॉ. शुभांगी दळवी, वेटलिफ्टर कोमल वाकळे व सॉफ्टबॉल पटू फिजा सय्यद यांची विशेष उपस्थिती असेल.

स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी जलसंपदा विभागाने विविध समित्या स्थापन केल्या असून, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या क्रीडा विभागानेही मोलाचे सहकार्य केले आहे. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती मैदानावरील शिट्टी वाजण्याची !

*****

संबंधित पोस्ट

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातही पावसाच्या सरी…

शासनाची परवानगी न घेता स्थलांतरित झालेल्या यश विद्यानिकेतन संस्थेवर कारवाई करण्यात येणार- शिक्षण मंत्री दादाजी भुसे· आरटीई प्रवेश प्रक्रियेत त्रुटी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही प्रशासकीय कारवाई सुरू

माओवाद्यांना हिंसेचा त्याग करून शस्त्रे खाली ठेवून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होऊन सन्मानाचे जीवन जगण्याचे पोलीस महासंचालक, म. रा. श्रीमती रश्मि शुक्ला यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमुळे शक्य झाले यकृत प्रत्यारोपण पत्नीच्या यकृतदानातून पतीला मिळाले नवजीवन..

राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे योजनाप्रवासी कंपनीची निवड करण्याकरिता GeM पोर्टलवर निविदा प्रसिद्ध

vishwatmaklokswamivarta

सत्ता आमची लालसा नसून समाज संघटन आमचे उद्दिष्ट आहे – आ.संजय केनेकर