vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

मानसिक शांतता, आरोग्यवर्धनासाठी संगीत प्रभावी माध्यम- डॉ. संतोष बोराडे

मानसिक शांतता, आरोग्यवर्धनासाठी संगीत प्रभावी माध्यम- डॉ. संतोष बोराडे

मुंबई, प्रतिनिधी : मानवाच्या मानसिक, भावनिक आणि शारीरिक आरोग्यावर संगीताचा सकारात्मक परिणाम होतो, हे आता संशोधनातून सिद्ध झाले आहे. संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन न राहता, कार्यक्षमतेत वाढ, मानसिक शांतता आणि आरोग्यवर्धनासाठी प्रभावी माध्यम ठरू शकते, असे जीवनसंगीत समर्थक डॉ. संतोष बोराडे यांनी सांगितले.टेक-वारी कार्यक्रमांतर्गत मंत्रालयात ‘जीवन संगीत’ या विषयावर डॉ. संतोष बोराडे यांचे व्याख्यान झाले.डॉ. संतोष बोराडे म्हणाले, तंत्रज्ञान म्हणजे केवळ यंत्र नाही, तर जीवन जगण्याची आधुनिक पद्धती आहे. छोट्या-छोट्या गोष्टी समजून घेतल्यास जीवन अधिक सुलभ आणि आनंददायी होऊ शकत. आजच्या तंत्रज्ञानप्रधान युगात सतत अद्ययावत राहणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणे हे जिवंतपणाच लक्षण आहे

संगीतामध्ये माणसाचे आयुष्य बदलण्याची ताकद असते. चांगले संगीत मनाला उभारी देते, विचारशक्ती प्रगल्भ करते आणि नातेसंबंधांमध्ये सौहार्द निर्माण करते. अनेकवेळा जीवनातील तणाव, नैराश्य, किंवा अडचणींच्या वेळी संगीतच माणसाला मानसिक आधार देते

डॉ. बोराडे यांनी या सत्रात ओव्या, गीत आणि संगीताच्या माध्यमातून तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल उपस्थितांशी संवाद साधला. तंत्रज्ञान हे सतत अद्ययावत राहण्याची प्रक्रिया आहे. रोज काहीतरी नवीन शिकण्याची वृत्ती अंगीकारली, तर वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन दोन्ही समृद्ध होऊ शकते असेही त्यांनी यावेळी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्या- जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा द्याव्यात – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

वृत्तेश्वर गणेशोत्सव मंडळ, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आणि थायोकेअर लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने..बुलढाण्यात मोफत थायरॉईड तपासणी शिबिर 3 सप्टेंबरला

vishwatmaklokswamivarta

जिल्हा रुग्णालयात #हृदयरोग निदान व #आरोग्यशिबीर संपन्न शिबिरात 181 बालकांची तपासणी तर 75 पात्र बालकांवर किम्स हॉस्पिटल ठाणे येथे लवकरच मोफत हृदय शस्त्रक्रिया                                                                                  

vishwatmaklokswamivarta

जीबीएस सिंड्रोमची लक्षणे  

vishwatmaklokswamivarta

राज्यातील सर्वात मोठ्या 50 बेड्स क्षमतेच्या नमुंमपा डायलिसीस सेंटरची आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केली पाहणी