vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

जीबीएस सिंड्रोमची लक्षणे  

जीबीएस सिंड्रोमची लक्षणे

आरोग्य प्रतिनिधी

-GBS ची लक्षणं हळूहळू वाढत जाणारी असतात आणि सामान्यतः शरीराच्या खालच्या भागापासून (पाय) वरच्या भागाकडे (हात आणि चेहरा) पसरतात.

सुरुवातीची लक्षणे- दोन्ही पायांमध्ये सुन्नपणा किंवा मुंग्या येणे. पायातून चपला निसटून जाणे, हलकी वेदना किंवा अस्वस्थता. (मुलांमध्ये आढळ शकते) हाता पायांमध्ये जडपणा किंवा जाणीव कमी होणे. लक्षणे कमी न होता एक-दोन दिवसांमध्ये त्याची वाढ होण्यास सुरुवात होते. ही लक्षणे अगदी साधी असल्याने यांच्याकडे दुर्लक्ष होऊ शकते.

प्रगतीशील लक्षणे- ही लक्षणे शरीराच्या दोन्ही बाजूंमध्ये सारख्या प्रमाणातच दिसून येतात. प्राथमिक लक्षणानंतर ही वाढत जाणारी लक्षणे सुरू होतात आणि साधारण दोन आठवड्यात सर्वाधिक परिणाम दिसून येतो. स्नायूंमध्ये कमकुवतपणा (पाय, हात, चेहरा) आल्याने हालचाल न करता येणे, हालचालींमध्ये अडथळा किंवा असमर्थता, संतुलन बिघडणं. गिळताना किवा बोलताना त्रास होणं, लघवी करता न येणे

गंभीर लक्षणे- केवळ हाता-पायाऐवजी इतरही नसा बाधित झाल्या असतील तर गंभीर लक्षणे देखील दिसून येतात. जसे – श्वास घेण्यास त्रास (रेस्पिरेटरी फेल्युअर), हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता, रक्तदाबामध्ये अत्याधिक चढ-उतार. या आजाराच्या काही धोक्याच्या खुणा किंवा चेतावणी चिन्हं (Warning Signs) आहेत. जसे -पायांपासून सुरू झालेला सुन्नपणा जो हळूहळू वर पसरतो. स्नायूंमध्ये अचानक कमजोरी वाटणे, गिळण्यास त्रास होणं किंवा आवाजात बदल होणे, श्वास घेण्यास त्रास जाणवणे.

वरीलपैकी कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. आजाराचे निदान जेवढ्या लवकर होईल तसेच जेवढ्या लवकर उपचारांना सुरुवात होईल तेवढाच कमी काळ हा आजार बरा होण्यासाठी लागेल. आजाराचे निदान करण्यासाठी पाठीच्या मज्जारज्जू भोवतीचे पाणी म्हणजे CSF तपासले जाते, रक्ताच्या आणि नर्व्ह कंडक्शनच्या तपासण्या केल्या जातात. मात्र आजाराचे निदान हे मुख्यतः लक्षणांवरूनच केले जाते.

आजाराच्या आधी आजार टाळण्यासाठी किंवा आजाराच्या सुरुवातीच्या काळात घ्यावयाची काळजीः

संक्रमण टाळा: सर्दी, खोकला, फ्लू यांसारख्या संसर्गजन्य आजारांपासून स्वतःला वाचवा. आरोग्यपूर्ण सवयी संपूर्ण कुटुंबाने पाळल्या तर असे आजार टाळता येऊ शकतात. हा आजार मुख्यतः दूषित अन्न किंवा पाण्यापासून होऊ शकत असल्याने त्याविषयी विशेष काळजी घ्या. बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा, अन्न, दूध व्यवस्थित गरम करा, तंदुरुस्त राहा. संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत हवी. त्यासाठी पोषणयुक्त आहार घ्या, पुरेशी झोप घ्या आणि व्यायाम करा. लक्षणांकडे लक्ष द्या. पायांपासून सुरू होणारा सुन्नपणा किंवा कमजोरी जाणवल्यास त्वरित डॉक्टरांना भेटा. आजाराच्या काळात घ्यावयाची काळजी: GBS ची उपचारपद्धती हे एक टीम वर्क असते. आजाराच्या उपचारासोबतच गुंतागुंत टाळण्यासाठीदेखील हॉस्पिटलमध्ये काळजी घेतली जाते.0000

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून दोन महिन्यात 14 लाख 45 हजार रुपयांची मदत.. – जिल्हा स्तरावरच मदत मिळत असल्याने रूग्णांना दिलासा

नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना ६.८३ कोटी रुपयांचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर – मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

कराड येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरु

मावळातील प्रमुख पर्यटनस्थळांवर बंदी आदेश लागू; ३१ ऑगस्टपर्यंत कलम १६३ लागू पर्यटकांनी सुरक्षिततेसाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन

अतिक्रमणमुक्त आणि हरित श्रीरामपूर शहरासाठी कटिबद्ध – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील श्रीरामपूर येथे विकासकामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा..