vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना ६.८३ कोटी रुपयांचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर – मंत्री मकरंद जाधव-पाटील

नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना ६.८३ कोटी रुपयांचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर – मंत्री मकरंद जाधव-पाटील

मुंबई प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील पाच गावांमधील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना स्वेच्छा पुनर्वसनासाठी एकूण ६ कोटी ८३ लाख १ हजार ८८७ रुपये अनुदान मंजूर करण्यात आल्याचा शासन निर्णय मदत व पुनर्वसन विभागाने निर्गमित केला आहे. याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणात विशेष पाठपुरावा केल्याचेही मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.

या प्रकल्पामुळे नरडवे, जांभळगाव, भैरवगाव, यवतेश्वर आणि दुगनगर ही पाच गावे बाधित झाली आहेत. एकूण ९६१ प्रकल्पबाधित कुटुंबांपैकी १५२ कुटुंबांनी स्वेच्छा पुनर्वसनाचा पर्याय स्वीकारला आहे.मंजूर अनुदानामध्ये घरांसाठी ६ कोटी ५५ लाख १५ हजार ७२० रुपये, तर जमिनीबाबत २७ लाख ८६ हजार १६७ रुपये अनुदानाचा समावेश आहे. नरडवे येथील ८४, जांभळगाव येथील १६, भैरवगाव येथील २, यवतेश्वर येथील ४ आणि दुगनगर येथील ४६ कुटुंबांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

मंजूर अनुदानाची रक्कम जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्यामार्फत पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे प्रकल्पबाधित कुटुंबांच्या पुनर्वसन प्रक्रियेला गती मिळण्यासोबतच नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाचे काम नियोजनानुसार पूर्ण करण्यास मदत होणार आहे.

प्रकल्पबाधित कुटुंबांच्या पुनर्वसनाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून, त्यांना न्याय व वेळेत मदत मिळावी यासाठी शासन कटिबद्ध आहे. या निर्णयामुळे १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांच्या पुनर्वसन प्रक्रियेलाही गती मिळणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी सांगितले.

शासन निर्णय : https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202609031459269941.pdf

0000

संबंधित पोस्ट

सेवा पंधरवडा उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी- राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर

vishwatmaklokswamivarta

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत तालुकास्तरीय मास्टर ट्रेनर्सचे निवासी प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न..

vishwatmaklokswamivarta

जागतिक मधमाशी दिनानिमित्त बुलढाण्याच्या राजेंद्रदास बैरागी यांना राज्यस्तरीय “मधुमीत्र” पुरस्कार

हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू सर्व यंत्रणांनी नियोजनबद्ध व काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना

vishwatmaklokswamivarta

जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता असल्याने दक्षता बाळगावी..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील लहान शहरांच्या विकासाला वेग; मुंबई, महाराष्ट्राला अधिक शक्ती देणारा अर्थसंकल्प प्रधानमंत्र्यांच्या स्वप्नातील विकसित भारताच्या दिशेने निर्धारपूर्वक पाऊल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

vishwatmaklokswamivarta