मुंबईतील गोवंडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील गोवंडी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान या मैदानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ माजी मंत्री आमदार नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील सर्व लोकांना इफ्तार पार्टीचे निमंत्रण देण्यात आले होते त्यात मोठ्या संख्येने विभागातील वरिष्ठ नागरिक महिला कार्यकर्ते मुले आणि पार्टी चे हजारो कार्यकर्ता यावेळी उपस्थित होते यावेळी रमजानच्या उपास चालू असल्यामुळे प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी त्यांनी सायंकाळी उपवास सोडण्यासाठी संपूर्ण तयारी केली होती यामध्ये थंड पाणी शरबत खजूर फ्रुट इत्यादी आणि बिर्याणी यांचा समावेश करण्यात आला होता सदर ठिकाणी जमलेल्या इफ्तार पार्टीतील मान्यवरासह लोकांनी सहभाग नोंदवून इफ्तार पूर्ण केला यावेळी पूर्व मंत्री नवाब मलिक आमदार सना मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव इस्तीयाक खान आणि अन्य मान्यवर नेते मंडळी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते