vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी नामांकने पाठवण्याचे आवाहन   • नामांकने पाठवण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2026   • नामांकने, राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर, ऑनलाईन सादर करता येणार

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 साठी नामांकने पाठवण्याचे आवाहन   • नामांकने पाठवण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2026   • नामांकने, राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर, ऑनलाईन सादर करता येणार

 

जालना, प्रतिनिधी: राष्ट्रीय पातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार (पीएमआरबीसी) 2026 साठी, नामांकने पाठवावीत, असे आवाहन सरकारने केले आहे. देशभरातल्या मुलांना, त्यांच्या अद्वितीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दरवर्षी प्रदान केले जातात. शौर्य, क्रीडा, सामाजिक शास्त्रे, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण आणि कला-संस्कृती अशा विविध क्षेत्रात, अद्वितीय, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुलांचा, हे पुरस्कार देऊन, सन्मान केला जातो.

 पाच वर्षे वयाच्या पुढचे आणि 18 वर्षांपर्यंतचे (31 जुलै, 2026 रोजी) कोणतेही मुले/मुली या पुरस्कारासाठी पात्र आहेत. मात्र, ते भारतीय नागरिक आणि भारतात वास्तव्य करणारे असणे आवश्यक आहे.

नागरिकांनी मानांकने केवळ राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल https://awards.gov.in वरुनच भरावीत. स्वयं-नामांकन आणि कोणीही केलेल्या शिफारसी स्वीकारल्या जातीत. ऑनलाइन आवेदने पाठवण्याची शेवटची तारीख 31 जुलै, 2026 आहे. अधिक सविस्तर माहितीसाठी, कृपया राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलला भेट द्या. (https://awards.gov.in).

0000

संबंधित पोस्ट

मौजे सोमनाथ (ज.) ता.जालना येथील सुरेश एखंडे यांचाभाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

मिरवणूकांच्या अनुषंगाने सांगली पोलीस दल सतर्क जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात..

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारचे रोजगार निर्मिती ला प्राधान्य ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

जाफराबाद, भोकरदन, घनसावंगी -अंबड, बदनापूर, जालना येथील आंदोलन-एसटीच्या तिकीट दर वाढीच्या निषेधार्थ जिल्हाभरात शिवसेनेच्या वतीनेचक्काजाम व निदर्शने…

vishwatmaklokswamivarta

जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५चे उद्घाटन जलव्यवस्थापनात नागरिकांचा सहयोग आवश्यक- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे निर्जलीकरण प्रशिक्षण…