vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गतीमान प्रशासनासाठी ई-ऑफिस प्रणालीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा–अपर मुख्य सचिव विकास खारगे

गतीमान प्रशासनासाठी ई-ऑफिस प्रणालीसह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा–अपर मुख्य सचिव विकास खारगे

जालना, प्रतिनिधी): महसूल विभाग हा समाजासाठी काम करणारा महत्त्वाचा घटक असल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखुन काम करत, गतिमान प्रशासनासाठी ई-ऑफिस प्रणाली आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महसुल विभागाच्या आढावा बैठकीत श्री. खारगे बोलत होते. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधू, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी मनिषा देशपांडे, सुकेशिनी पगारे, सह जिल्हा निबंधक रामेश्वर रोडगे, जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख एम. पी. मगर, तहसिलदार छाया पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अपर मुख्य सचिव श्री. खारगे पुढे म्हणाले की, नागरीकांना पारदर्शकपणे सेवा देण्यासाठी तसेच शासकीय कामकाजात गती आणुन कामाकाजातील प्रलंबितता कमी करण्यासाठी सर्व महसुल यंत्रणांनी ई-ऑफिस प्रणालीचा वापर करणे आवश्यक आहे. शासनने ईज ऑफ डुइंग बिझनेसचे धोरण स्विकारले आहे. तसेच महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी आठवड्यातून एक दिवस क्षेत्रीय दौरा करावा. यामुळे नागरिकांचे प्रश्न समजावून घेण्यास मदत होते. तसेच त्यांनी दिलेल्या निवेदनांवर सकारात्मक कारवाई करावी. तसेच विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करुन, गुणवत्ता जाणून घेण्यास मदत होते. प्रशासनाने नागरिकामध्ये जावून काम करण्याचा प्रयत्न करावा. नागरिकांच्या समस्या, तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करुन त्यांच्या तक्रारींचा पाठपुरावा घ्यावा. कोणताही पाणंद रस्ता घेण्यापूर्वी तो अतिक्रमणमुक्त असावा, तसेच भूमी अभिलेख कार्यालयाकडून त्याचे सीमांकन करुन घ्यावे. पाणंद रस्त्यांच्या दर्जेदार कामांवर लक्ष ठेवण्याचे आणि पावसाळ्यापूर्वी जास्तीत-जास्त रस्ते पूर्ण करण्याचे नियोजन करावे. तसेच शासकीय जमिनी अतिक्रमण विरहित कशा राहतील तसेच त्यांचे व्यवस्थापन कसे करता येईल याचे नियोजन करावे. शासकीय आणि खाजगी जागेची जबाबदारी महसुल विभागाकडे आहे. याकरीता सर्व सातबारा आणि मिळकत पत्रिका व्यवस्थित सुरक्षित ठेवाव्यात. तसेच नागरिकांना अनावश्यक त्रास होऊ नये, यासाठी सर्व अर्जांची वेळेत व पारदर्शक पद्धतीने पूर्तता करण्याचे आवाहन केले.

यावेळी अपर मुख्य सचिव श्री. खारगे यांनी त्यांनी जनगणना, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान, शासकीय जमिनी वाटप व शर्तभंग प्रकरणे,पर्यायी वनीकरण,वन जमिनीचे 7/12 अद्ययावत करणे, सिलिंग जमिन प्रकरणे, शेत व पाणंद रस्ते योजना, ई-पीक पाहणी, फेरफार नोंदी, वनहक्क दावे, अवैध गौण खनिज, घरकुलांना वाळू उपलब्ध करुन देणे आदी विषयांसह महसूल विषयक इतर कामांचाही आढावा घेतला. तसेच महसूल विभागातील प्रलंबित कामे, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम करण्याच्या सूचना दिल्या.

निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी सादरीकरणांद्वारे महसुल विभागातील विविध विषयांचा सविस्तर माहिती सादर केली. यावेळी बैठकीस जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, उपअधिक्षक भूमि अभिलेख, सह दूय्यम निबंधक यांची ऑनलाईन उपस्थिती होती.

 

****

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महिलांकरिता बेलापूर व ऐरोली मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र

२३ मतमोजणी कक्षात उद्या सकाळी १० वाजता मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार – महानगरपालिका आयुक्त तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सरकारचा मंत्रिमंडळ निर्णय….

vishwatmaklokswamivarta

वैद्यकीय देयकांचा निपटारा आता होणार ‘महाकर्मी’ पोर्टलद्वारे

हिंगोली- नांदेड- परभणी या भागात -पहाटे ०१:३७ वाजता ४.६ रिश्टर स्केल इतक्या तिव्रतेचा भुकंपचा धक्का- कोणतीही वित्तीय जीवित हानी नसल्याचे वृत्त

सिंगल यूज प्लास्टिक वापरास नकार, हाच पर्यावरण संवर्धनाला होकार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वातावरण बदल प्रचार मोहिमेचा शुभारंभ