vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा ३१ मे रोजी  जिल्ह्यातील १५ उपकेंद्रांभोवती प्रतिबंधात्मक आदेश..

एमपीएससीची संयुक्त पूर्व परीक्षा ३१ मे रोजी  जिल्ह्यातील १५ उपकेंद्रांभोवती प्रतिबंधात्मक आदेश..

अहिल्यानगर, प्रतिनिधी: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित ‘महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६’ रविवार, दि. ३१ मे रोजी सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत जिल्ह्यातील १५ परीक्षा उपकेंद्रांवर होणार आहे. परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी आयोगाचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांनी परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ (बीएनएसएस) च्या कलम १६३ (३) अंतर्गत सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.
या परीक्षेसाठी अहिल्यानगर जिल्हा केंद्रावर एकूण ५ हजार ३७३ उमेदवार प्रविष्ट झाले आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी ३ समन्वय अधिकारी (वर्ग-१ उपजिल्हाधिकारी संवर्ग), १ भरारी पथक अधिकारी, १५ उपकेंद्रप्रमुख, ५३ पर्यवेक्षक, २४६ समवेक्षक, ४ सहायक, ३० लिपिक, १५ केअरटेकर, १५ बेलमन, १५ शिपाई, ५३ पाणीवाटप कर्मचारी आणि २० वाहनचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उमेदवारांना परीक्षा केंद्रावर सकाळी ९.३० वाजल्यापासून प्रवेश दिला जाणार आहे. परीक्षेतील उत्तरे लिहिण्यासाठी केवळ काळ्या शाईचे बॉलपॉइंट पेन वापरणे आवश्यक असून आयोगाने दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मोबाईल, कॅल्क्युलेटर, डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन आदी दूरसंचार साधने परीक्षा केंद्र परिसरात किंवा परीक्षा दालनात आणण्यास तसेच स्वतःजवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्रे आयोगाच्या संकेतस्थळावरून स्वतः डाउनलोड करून घ्यावीत. दुय्यम प्रवेशपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिली जाणार नसल्याची नोंद उमेदवारांनी घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परिसरातील एसटीडी बुथ, फॅक्स व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
0000

संबंधित पोस्ट

भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी पदासाठी तरुणांना मोफत प्रशिक्षणाची सुवर्णसंधी..

सांगली जिल्ह्यात 44 गावातील 47 नवीनरास्त भाव दुकानासाठी अर्ज करावेत- जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

पुण्यश्लोक “अहिल्यादेवींच्या ३०० व्या जयंतीनिमित्त रंगोळी, वेशभूषा आणि निबंध स्पर्धांचे बक्षीस वितरण”अहिल्यादेवींच्या सन्मानातून संस्कृती जपली पाहिजे – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जिल्ह्यात नोंदणीविना कार्यरत दिव्यांग संस्थांवर होणार कारवाई३० नोव्हेंबर पर्यंत नोंदणी अनिवार्य — जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडून पद व गोपनीयतेची शपथ

vishwatmaklokswamivarta

गुढीपाडवा कसा साजरा करावा: परंपरा, विधी आणि आध्यात्मिक महत्त्व…

vishwatmaklokswamivarta