vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

५ वर्षांच्या विश्रांतीनंतर कैलास मानसरोवर यात्रेला २० जूनपासून सुरुवात होणार; पहिला ताफा यात्रेकरूंचा उद्या गंगटोकला पोहोचणार

५ वर्षांच्या विश्रांतीनंतर कैलास मानसरोवर यात्रेला २० जूनपासून सुरुवात होणार; पहिला ताफा यात्रेकरूंचा उद्या गंगटोकला पोहोचणार

 

राज्य प्रतिनिधी-५ वर्षांच्या विश्रांतीनंतर कैलास मानसरोवर यात्रेला २० जूनपासून सुरुवात होणार; पहिला ताफा यात्रेकरूंचा उद्या गंगटोकला पोहोचणार आहे पाच वर्षांनंतर भारत-चीनने कैलास-मानसरोवर यात्रा यंदाच्या जूनपासून सुरू करण्याचे ठरवले आहे. लडाख सीमेवरून दोन्ही देशात निर्माण झालेला तणाव कमी झाल्याचे यातून दिसून येत आहे. केंद्रीय परराष्ट्र खात्याने शनिवारी ही यात्रा जून ते ऑगस्ट दरम्यान सुरू केली जाईल असे जाहीर केले.

5 वर्षांनंतर भारत-चीनने कैलास-मानसरोवर यात्रा यंदाच्या जूनपासून सुरू करण्याचे ठरवले आहे. लडाख सीमेवरून दोन्ही देशात निर्माण झालेला तणाव कमी झाल्याचे यातून दिसून येत आहे. केंद्रीय परराष्ट्र खात्याने शनिवारी ही यात्रा जून ते ऑगस्ट दरम्यान सुरू केली जाईल असे जाहीर केले.

उत्तराखंडमधील लिपूलेख पास व सिक्कीममधील नाथुला पास या दोन मार्गांनी यात्रा सुरू करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी अखेरची यात्रा ही २०१९ मध्ये झाली होती. पण २०२० मध्ये कोरोना महामारी आणि चीनसोबत सीमेवरील तणावामुळे ती स्थगित करण्यात आली होती. कैलास पर्वत व मानसरोवर हे चीनच्या तिबेट या स्वायत्त प्रांतात आहे. हे स्थळ हिंदू, जैन व बुद्ध धर्मासाठी पवित्र आहे.सर्व प्रक्रिया ऑनलाइन, इथे करा नोंदणी- भाविकांच्या एकूण पाच तुकड्या लिपुलेखमार्गे पाठवल्या जातील. प्रत्येक तुकडीत ५० भाविक असतील. तर, नाथुलामार्गे येथून दहा तुकड्या पाठवल्या जातील, प्रत्येक तुकडीत ५०-५० भाविक असतील. या यात्रेसाठी kmy.gov.in या बेवसाइटवर अर्ज करावा. या यात्रेसाठी भाविकांची निवड संगणकाच्या सहाय्याने निःपक्षपातीपणे केली जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. अर्जदारांना पत्र पाठवण्याची गरज नाही. तसेच त्यांच्याकडून अन्य माहिती मागवली जाणार नाही.

संबंधित पोस्ट

अतितीव्र दिव्यांग व्यक्तींनी निर्वाह भत्ता योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 डिसेंबर पूर्वी प्रस्ताव सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

एक दिवसीय सायबर जागरुकता कार्यशाळा;आज जालना येथील कार्यालयांसाठी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

एका लग्नाची गोष्ट’-अनाथ पूजाला मिळाले हक्काचे घर; जिल्हाधिकाऱ्यांनी केले कन्यादान

प्रलंबित वनहक्क दावे निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवा – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी अचानक परीक्षा केंद्रावर

देशाची राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणूकीच्या 70 जागांसाठी  मतदान सुरुवात सकाळी सात वाजल्या पासून सुरू झाले आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येईल

vishwatmaklokswamivarta