देशाची राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणूकीच्या 70 जागांसाठी मतदान सुरुवात सकाळी सात वाजल्या पासून सुरू झाले आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येईल
राज्य प्रतिनिधी – दिल्ली मध्ये आज 70 विधानसभा जागांसाठी मतदान सुरू झालं आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे मतदान सुरू राहणार आहे. दरम्यान दिल्ली मध्ये 1,56,14, 000 मतदार आहेत. त्यामध्ये 83,76173 पुरूष तर 7236560 महिला आहेत. 1267 ट्रान्स जेंडर आहेत. आज दिल्लीत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली
पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये मतदार AI-based Queue Management System app वापरू शकतात. “Delhi Election – 2025 QMS” हे गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. यामध्ये रिअल टाईम गर्दी ट्रॅक करता येऊ शकते. सोबतच कलर कोडेड पोलिंग स्टेशन आहेत. हेल्पलाईन नंबर 1950 आहे
दिल्ली मध्ये आम आदमी पार्टी ची सत्ता आहे त्यामुळे आता तिसर्यांदा आप सत्तेमध्ये येण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर भाजपा आप वर मात करत सरकार स्थापनेसाठी पूर्ण प्रयत्न करताना दिसत आहे काँग्रेस पक्षासह एनसीपी ही निवडणूक लढताना दिसत आहे
बुधवारी सकाळी ७ वाजल्यापासून दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराज्यपाल व्हीके सक्सेना, राहुल गांधी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी मतदान केले आहे. सकाळी ११:०० वाजेपर्यंत १९.९५% मतदान झाले आहे.