vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

जिल्हा प्रशासनाचे आवाहन नागरिकांनी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने दक्षता घ्यावी…

जिल्हा प्रशासनाचे आवाहन नागरिकांनी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने दक्षता घ्यावी…

राज्य प्रतिनिधी :- प्रादेशिक हवामानशास्त्रर केंद्र, कुलाबा, मुंबई यांच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्याकत दि. 31 मे ते 2 जुन 2026 या कालावधीत अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्याच कडकडाटासह, सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. तरी दि. 31 मे ते 2 जुन 2026 रोजी पर्यंत ऑरेंज अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्याी कडकडाटासह, सोसाट्याचा वारा (ताशी 40-50 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलक्यास ते मध्यम स्वारुपाच्याी पावसाची शक्यतता वर्तवली आहे. तसेच दि. 31 मे ते 2 जुन 2026 रोजी पर्यंत यलो अलर्ट जारी केला असून तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्याा ते मध्यम स्व6रुपाच्याो पावसाची शक्यकता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी वादळी वारे, विजेपासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 मेघगर्जनेच्यार वेळी, विज चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्याहवा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विज चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजाचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मरजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या, लोंबणाऱ्या तारांपासून दूर रहावे. वीज चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे. जमिनीशी कमीतकमी संपर्क असावा. शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी किंवा झाकून ठेवावी. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हारधिकारी कार्यालयातील जिल्हाक नियंत्रण कक्ष तसेच नजीकच्या तहसील कार्यालयात, पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान 25 डिसेंबर रोजी उत्तर प्रदेशला भेट देणार

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; दोन लाखांपर्यत शेती किंवा पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क पुर्णपणे माफ 

विशेष लेख – २२ एप्रिल  जागतिक वसुंधरा दिन पर्यावरणीय संकल्पाचा मुहूर्त

सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा शासनाचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुढाळे येथील महापारेषणच्या २२०/३३ के.व्ही. उपकेंद्राचे भूमिपूजन

बीकेसीतील तीन भूखंडांच्या भाडेपट्ट्यातून एमएमआरडीएला मिळाले ३ हजार ८४० कोटी ४९ लाख; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वाटपपत्र प्रदान महाराष्ट्राची आर्थिक केंद्र म्हणून दमदार वाटचाल; १५ हजार हाय-टेक नोकऱ्यांची निर्मिती शक्य

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी प्रशासन सज्ज-मतदान कर्मचाऱ्यांना थेट केंद्रावरच मिळणार ईव्हीएम व साहित्य,३ लाख ३३ हजार ५४५ मतदार बजावणार हक्क ; सर्व मतदान केंद्रांवर ‘वेबकास्टिंग’ची नजर, कडेकोट बंदोबस्त