vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारणस्थानिक बातम्या

मतदार यादीतील घोळांचे प्रदर्शन: नवी मुंबईत मनसेचा निवडणूक आयोगावर थेट प्रहार!

मतदार यादीतील घोळांचे प्रदर्शन: नवी मुंबईत मनसेचा निवडणूक आयोगावर थेट प्रहार!

नवी मुंबई प्रतिनिधी-

नवी मुंबईतील मतदार यादीत झालेल्या गंभीर चुका आणि अनियमितता आता थेट लोकांसमोर आल्या आहेत. मनसेने आज (७ नोव्हेंबर २०२५) वाशी येथे “मतदार यादीतील घोळ” या नावाने धक्कादायक चित्रप्रदर्शनाचे आयोजन केले. या प्रदर्शनाचे उद्घाटन मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते झाले.

मनसे प्रवक्ते व शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या पुढाकारातून भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात २० पेक्षा अधिक धक्कादायक घोळ मांडण्यात आले होते.

त्यामध्ये —आयुक्तांच्या निवासस्थानी १२७ मतदारांची नोंद,सुलभ शौचालयात मतदारांची नोंद,आणि पाम बीच रोडवर तब्बल २५० मतदार नोंदवले गेल्याचे समोर आले!त्याशिवाय, कोपरखैराणे परिसरात एकाच मोबाईल क्रमांकावर २८८ मतदार, तर बेलापूर व ऐरोली विधानसभा क्षेत्रांमध्ये मंदिर आणि शाळांचे पत्ते मतदारांच्या नोंदीसाठी वापरलेले असल्याचे आढळले. सीवूड्समध्ये तर तलावाच्या काठावर शेकडो लोक राहत असल्याची नोंद दाखवली गेली, ज्यावर मनसेने “मगरींसोबत मतदार कधीपासून राहू लागले?” असा उपरोधिक प्रश्न उपस्थित केला.

प्रदर्शन पाहिल्यानंतर अमित ठाकरे म्हणाले —हे प्रदर्शन म्हणजे प्रत्येक खऱ्या मतदाराच्या गालावर एक चपराक आहे! निवडणूक आयोगाने दुर्लक्षित केलेल्या चुका मनसेने लोकांसमोर आणल्या आहेत. आता खरे मतदारच मैदानात उतरून या अन्यायाविरुद्ध उभे राहिले पाहिजे!”

या प्रदर्शनास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, महिला जिल्हाप्रमुख रंजना शिंत्रे, प्रवीण म्हात्रे, अतुल कुलकर्णी आदी मान्यवरांनी भेट दिली.मनसेचे गजानन काळे, सविनय म्हात्रे, विनोद पार्टे, विलास घोणे, सचिन कदम, अभिजीत देसाई, डॉ. आरती धुमाळ, नितीन खानविलकर, संदेश डोंगरे, सनप्रीत तुर्मेकर, अनिकेत पाटील, यशोदा खेडसकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी या प्रदर्शनाच्या यशासाठी मोठी मेहनत घेतली.

नवी मुंबईकरांनी मतदार यादीतील या भोंगळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त करत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

महाज्योती’च्या स्पर्धा परीक्षेच्या ऑनलाईन प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसादओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीची संधी,विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार अर्जाची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली.

अंधश्रद्धा, विषमता आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध सत्यशोधकांचा एल्गार — कोकण विभागीय परिषद १२ एप्रिलला नवीन पनवेलमध्ये

मुंबई ‘क्रिएटिव्ह इकॉनॉमी’चे जागतिक केंद्र होणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुंबईत ‘आयआयसीटी’ चा शुभारंभ; क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात नवे पर्व– केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव

सुधागड तालुका आमदार सन्मान चषक श्री स्वयंभु हनुमान क्रीडा मंडळ चिवे संघाने पटकावला

vishwatmaklokswamivarta

अण्णासाहेब पाटील महामंडळ व बँकेच्या योजनांचे शहापूर तालुक्यात मार्गदर्शन शिबिर संपन्न

समाजसेवेच्या आदर्शांचा गौरव – अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंतीनिमित्त जनजागृती उपक्रम-समाजसेवेच्या आदर्शांची आठवण, अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त जिल्हाभरात जनजागृती कार्यक्रम – जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे