vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

आयसीसी महिला विश्वचषक २०२५ या स्पर्धेत विश्वविजेता ठरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार केला. भारताला प्रथमच #विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले. 

आयसीसी महिला विश्वचषक २०२५ या स्पर्धेत विश्वविजेता ठरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार केला. भारताला प्रथमच #विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

मुंबई प्रतिनिधी- आयसीसी महिला विश्वचषक २०२५ या स्पर्धेत #विश्वविजेता ठरलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सहकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्कार केला. भारताला प्रथमच #विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.

यावेळी उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, राधा यादव यांना प्रत्येकी २ कोटी २५ लाख, तर प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांना २२ लाख ५० हजार आणि सर्व सहकारी यांना प्रत्येकी ११ लाख रुपये व सन्मानचिन्ह प्रदान करून मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सत्कार केला. गोलंदाजी प्रशिक्षक आविष्कार साळवी, पद्मश्री डायना एडल्जी, ॲनालिस्ट अनिरुद्ध देशपांडे, लॉजिस्टिक सपोर्ट अपर्णा गंभीरराव, ऑपरेशन मॅनेजर मारुफ फजानदार, मिहिर उपाध्याय, पूर्वा काटे, ममता शिरसुल्ला यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, प्रधान सचिव संजय खंदारे, आयुक्त शितल तेली, उपसचिव सुनील पांढरे उपस्थित होते.

या ‍विश्वविजयाने भारताचा गौरव वाढवला आहे. प्रत्येक खेळाडूने कुठल्या ना कुठल्या सामन्यात निर्णायक भूमिका बजावली. प्रशिक्षक आणि संपूर्ण संघाचे विशेष अभिनंदन करावे लागेल. स्मृती मानधना सध्या भारतातील आयकॉनिक खेळाडूंमध्ये गणली जाते. तिचा सुरुवातीपासून आजपर्यंतचा प्रवास उल्लेखनीय आहे. जेमिमाह रॉड्रिग्जनेही सेमीफायनलमध्ये अप्रतिम खेळी सादर केली. राधा यादवने संघर्षमय प्रवास करत आपले अस्तित्व निर्माण केले. प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनी संघासाठी घेतलेली मेहनत आणि क्रिकेटमधील त्यांची कामगिरी प्रेरणादायी आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

०००
महिला क्रिकेटच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक क्षण आहे. पद्मश्री डायना एडल्जी यांनी लावलेले रोपटे आज मोठे झाले आहे. ग्रामीण भागातील मुलींना संधी मिळाली तर त्या जागतिक स्तरावर यश प्राप्त करू शकतात हे या क्रिकेट संघातील खेळाडूंनी सिद्ध केले आहे. या विजयाने क्रीडा रसिकांच्या अपेक्षा वाढल्या असून, भविष्यातही आपण असेच यश प्राप्त कराल अशी अपेक्षा आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार

 

संबंधित पोस्ट

मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुका, मनपा क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांना 20 व 21 ऑगस्ट रोजी सुट्टी

⛈️☔ मुंबई शहर व उपनगरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरू…

दहावीच्या विद्यार्थ्याने गिरवले प्रशासकीय कामकाजाचे धडे; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून “डे विथ कलेक्टर” उपक्रम प्रसादच्या जिज्ञासू वृत्तीचे व या उपक्रमाचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले कौतुक

vishwatmaklokswamivarta

नागसेन बुद्ध विहार येथे सावित्रीच्या लेकींकडून “सावित्रीमाई फुले” यांना जयंती निमित्त अभिवादन…

मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण घरकुल कामांचा पहाणी दौरा

vishwatmaklokswamivarta

गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो; हा आदर्श येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस