vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नमुंमपा सरळसेवा पदभरती परीक्षा प्रक्रिया दोन्ही दिवशी सुव्यवस्थितरित्या संपन्न 

नमुंमपा सरळसेवा पदभरती परीक्षा प्रक्रिया दोन्ही दिवशी सुव्यवस्थितरित्या संपन्न

        नवी मुंबई प्रतिनिधी – ‘नवी मुंबई महानगरपालिका सरळसेवा भरती – 2025 – 2026’ प्रक्रियेंतर्गत काल 21 जुलै रोजी 3 सत्रांमध्ये व आज 22 जुलै 2026 रोजी 2 सत्रांमध्ये 3 संवर्गातील 13 पदांसाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा सुयोग्य नियोजनामुळे अत्यंत सुव्यवस्थितरित्या संपन्न झाल्या. आज परीक्षेच्या दुस-या व अखेरच्या दिवशी पवई, मुंबई येथील केंद्रांवर सुरळीतपणे परीक्षा पार पडली. कालही 6 जिल्ह्यातील 13 केंद्रांवर नियोजनबध्द रितीने परीक्षा प्रक्रिया संपन्न झाली होती.

          टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) यांच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या एकूण 6 संवर्गातील 36 पदांकरिता 18,930 अर्ज ऑनलाईन प्राप्त झाले होते. त्या अनुषंगाने ऑनलाईन स्पर्धा परीक्षा केंद्रांवर महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेतील वर्ग 1 श्रेणीचे 8 समन्वय अधिकारी तसेच 13 केंद्र निरीक्षक अधिकारी दक्षतेने कार्यरत होते. या अधिकाऱ्यांनी परीक्षेच्या आदल्या दिवशी, 20 जुलै रोजीच नेमून दिलेल्या जिल्हयांमध्ये जाऊन परीक्षा केंद्रांवरील संपूर्ण व्यवस्थेची बारकाईने पाहणी केली. त्यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. ऑनलाईन परीक्षा असल्याने खबरदारी घेत सुरक्षा विभाग, केंद्र सरकार यांच्या मान्यतेने सर्व परीक्षा केंद्रातील परीक्षा कक्षांमध्ये मोबाईल जॅमर बसविण्यात आले होते.

          कालच्याप्रमाणेच आजही सकाळी ठीक 9.00 वाजता पवई, मुंबई येथील परीक्षा केंद्रांवर परीक्षेस नियोजन केल्याप्रमाणे वेळेवर सुरुवात झाली. आजच्या दोन्ही सत्रांमधील परीक्षा प्रक्रीया व्यवस्थित पार पडली.

          सकाळी 9 ते 11 वा. या पहिल्या सत्रात 588 उमेदवारांनी परीक्षा दिली.

दुपारी 1 ते 3 वा. या दुसऱ्या सत्रात 422 उमेदवारांनी परीक्षा दिली.

अशाप्रकारे नमुंमपा सरळसेवा भरती प्रक्रियेतील दुस-या दिवशी 1010 उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.

   नवी मुंबई महानगरपालिकेची भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पध्दतीने नियमानुसार काटेकोरपणे होत असून उमेदवारांनी नोकरी मिळवून देण्यासाठी कोणीही व्यक्ती कोणत्याही प्रकारची मागणी करीत असल्यास दक्ष रहावे व स्थानिक पोलीसांकडे तक्रार करावी असे सूचित करण्यात येत आहे. भरतीविषयक भूलथापांना व आमिषांना बळी न पडता तसेच याबाबत कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षेबाबतच्या यापुढील अद्ययावत माहितीसाठी उमेदवारांनी महानगरपालिकेचे अधिकृत संकेतस्थळ www.nmmc.gov.in तसेच महानगरपालिकेच्या अधिकृत सोशल मिडीया पेजला भेट द्यावी असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी केले आहे.

0099

संबंधित पोस्ट

भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या अपमानाविरोधात सर्वहारा समाजाचा ‘महामोर्चा’

विशेष गौरव पुरस्कारासाठी 22 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

पुणे-साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून शुभारंभ

मी मतदानाचा अधिकार बजावणार’ – स्वाक्षरी फलकाव्दारे मतदान जागरुकतेचा संदेश प्रसारण नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते मतदान जागरुकता स्वाक्षरी अभियानाचा शुभारंभ..

राष्ट्रपतींचे मुंबईत आगमन; राज्यपालांकडून स्वागत

त्वरित कारवाई करत, मुंबई वाकोला पोलिसांनी 60 वर्षीय व्यावसायिकाच्या अपहरणप्रकरणी 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपींना अटक केली

vishwatmaklokswamivarta