vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी नमुंमपा शाळा मुख्याध्यापकांची सहविचार कार्यशाळा

आगामी शैक्षणिक वर्षाच्या नियोजनासाठी नमुंमपा शाळा मुख्याध्यापकांची सहविचार कार्यशाळा

 

       नवी मुंबई प्रतिनिधी-   नवी मुंबई महानगरपालिकेच्या 80 प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक आणि केंद्र प्रमुख यांची सहविचार कार्यशाळा महापालिका मुख्यालयातील ज्ञानकेंद्रात संपन्न झाली. या मध्ये शाळा प्रवेशोत्सवाचे नियोजन तसेच शिक्षण रुपांतरण धोरण, समग्र शिक्षण अभियान तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकरीता व सर्वांगीण विकासाकरिता राबवावयाचे उपक्रम याविषयी माहिती देण्यात आली.

  अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार यांनी शाळा सुरु होण्याच्या पहिल्याच दिवशी 15 जून रोजी प्रत्येक शाळेत शाळा प्रवेशोत्सव समारंभ आयोजित करुन विद्यार्थ्यांचे उत्साही स्वागत करावे आणि त्यांच्या हातात पाठ्यपुस्तके व गणवेश प्राप्त होईल अशाप्रकारे नियोजन करावे असे निर्देश दिले. या शाळा प्रवेशोत्सव समारंभाप्रसंगी प्रत्येक शाळेत महानगरपालिकेचा एक अधिकारी उपस्थित राहणार असून सर्व शाळांमध्ये याबाबतची कार्यवाही प्रभावीपणे करावी असे सूचित केले. हे अधिकारी पुढील शैक्षणिक वर्षात त्या शाळेच्या भौतिक गरजा व शैक्षणिक उपक्रमाच्या कामगिरीत मार्गदर्शन करतील व गुणात्मक दर्जा उंचावतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शालेय गुणवत्ता वाढीकरीता मुख्याध्यापकांनी आपल्या शिक्षकांसह प्रभावी नियोजन करावे व कालबध्द अंमलबजावणी करावी अशाही सूचना त्यांनी केल्या.

  शिक्षण विभागाच्या उपआयुक्त श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांनी महानगरपालिकेने संमत केलेल्या शिक्षण रुपांतरण धोरणाचे माहितीपूर्ण सादरीकरण केले. मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावर हे धोरण यशस्वीपणे राबविण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीचे सविस्तर मार्गदर्शन करण्यासोबतच त्यांनी मागील वर्षातील समग्र शिक्षा अभियानाचा आढावा घेतला. आपले कामकाज डिजीटलायझेशनकडे गतीमान वाटचाल करत असून त्या अनुषंगाने ऑनलाईन कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे व त्यासाठी कार्यशाळा लावावी अशाही सूचना त्यांनी केल्या.

   शिक्षणाधिकारी श्री. अशोक कडूस यांनी शाळा स्तरावरील विविध समित्या, त्यांची रचना व कार्यपध्दती, विद्यार्थी सुरक्षा, प्रवेश प्रक्रिया तसेच गुणवत्ता शिष्यवृत्ती परीक्षण या विषयीची सविस्तर माहिती दिली. इयत्ता नर्सरीचे इंग्रजी माध्यमातील वर्ग 51 प्राथमिक शाळांमध्ये सुरु करण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच शालेय पोषण आहार विषयीचा आढावा घेण्यात आला.

    समन्वयक श्री. आत्माराम आंग्रे यांनी आप्पार, आधार या विषयीच्या समस्यांचे निराकरण करीत सध्या सर्व शाळांमध्ये सुरु असलेल्या ऑनलाईन उपक्रम प्रमोशन याबाबत सविस्तर माहिती दिली. निपुण महाराष्ट्र, पीजीआय अहवाल, यु – डायस प्लस अशा शालेय कामकाजाचा आढावा घेण्यासोबतच राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियान तसेच देशभक्तीपर गीतांवर कवायत याबाबत शाळांनी आत्तापासूचन तयारी ठेवावी असेही मार्गदर्शन त्यांनी केले.

      यावेळी मुख्याध्यापकांनी आपापल्या शाळेचे विविध प्रश्न मांडले त्यावर सकारात्मक मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम. सुलभा बारघरे यांनी आभार प्रदर्शन केले. या सहविचार कार्यशाळेमधून नव्या शैक्षणिक वर्षातील उद्दि ष्ट्ये व त्याच्या अंमलबजावणीसाठी निश्चित दिशा मिळाल्याचे अभिप्राय सहभागी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांनी व्यक्त केले.

00000

संबंधित पोस्ट

नमुंमपा जिल्हास्तरीय शालेय ‘व्हॉलीबॉल’ स्पर्धेला नवी मुंबईतील शाळा – महाविद्यालयांचा भरघोस प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा सांगली जिल्हा दौरा

मोरा गावातील मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा प्रश्न मार्गी लावा -मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

कराड येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरु

सागरी किनारा मार्गावरील बोगद्याजवळ हुल्लडबाजी करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई

आधार सेवांचे नवे दर 1 ऑक्टोबरपासून लागू होणार