vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गावकर्‍यांचा संताप उसळला; भ्रष्टाचारग्रस्त मुख्याध्यापक चाऊस यांच्या बडतर्फीची मागणी; उपोषणाचा ईशारा-मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यपद्धतीचे गावकर्‍यांकडून कौतुक; शिक्षक संघटनांच्या दबाव तंत्राची सखोल चौकशी करण्याची मागणी

गावकर्‍यांचा संताप उसळला; भ्रष्टाचारग्रस्त मुख्याध्यापक चाऊस यांच्या बडतर्फीची मागणी; उपोषणाचा ईशारा-मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यपद्धतीचे गावकर्‍यांकडून कौतुक; शिक्षक संघटनांच्या दबाव तंत्राची सखोल चौकशी करण्याची मागणी

जालना । प्रतिनिधी – तालुक्यातील राममूर्ती येथील ग्रामस्थांनी निलंबित मुख्याध्यापक अब्दुल्ला चाऊस यांच्या बडतर्फीची आक्रमक मागणी करत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे. क्रीडांगण विकास कामातील कथित भ्रष्टाचारामुळे मुख्याध्यापक चाऊस यांच्यावर कारवाई करण्यात आली असून, ही त्यांची तब्बल तिसरी निलंबनाची कारवाई असल्याची माहिती गावकर्‍यांनी दिली.

तक्रारदार शरद किसनराव लकडे, गोरखनाथ बालाभाऊ मुळे, विलास मगर तसेच समस्त ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात मुख्याध्यापक चाऊस यांच्या दीर्घकालीन गैरव्यवहारांचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे. गावातील उर्दू प्राथमिक शाळेच्या विकास कामावर गदा आणणार्‍या, शासन निधीचा गैरवापर करणार्‍या अशा भ्रष्ट मुख्याध्यापकाला सेवेत ठेवणे म्हणजे शिक्षण व्यवस्थेवर कलंक आहे, असे ग्रामस्थांनी ठामपणे नमूद केले आहे.

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचा न्याय्य निर्णय गावकर्‍यांसाठी दिलासा

मुख्याध्यापकाविरोधातील तक्रारी वर्षानुवर्षे दाबल्या अथवा दबल्या जात असतांना मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता थेट निलंबनाची कारवाई केली. या निर्णयामुळे गावकर्‍यांनी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या प्रामाणिक आणि पारदर्शक प्रशासनाची मनापासून प्रशंसा केली आहे. आपण न्यायपूर्ण व पारदर्शक निर्णय घेत संबंधित मुख्याध्यापकास निलंबित केले. केवळ निलंबन नव्हे, तर त्यांच्या सर्व पूर्वीच्या प्रकरणांची एकत्रित चौकशी करून थेट बडतर्फी व्हावी, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

शिक्षक संघटनांचा दबाव? गावकर्‍यांची तीव्र प्रतिक्रिया

दरम्यान, काही शिक्षक संघटनांनी प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी 7 दिवसात निलंबन मागे घ्या, नाहीतर उपोषणाला बसू अशा प्रकारची विधाने पत्रकारांशी बोलताना केली असल्याचे वृत्त विविध वृत्तपत्रात आले आहे. यावर गावकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

ग्रामस्थांचा सवाल आहे की, भ्रष्टाचारावर कारवाई झाली की शिक्षक संघटना बचावासाठी का धावतात? शासन मान्यताप्राप्त संघटनांचे हे काम आहे का? मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्णयाला आव्हान देण्याची हिम्मत या संघटनांना कशी होते?

गावकर्‍यांनी स्पष्ट केले की जर शिक्षक संघटना असे दबावतंत्र वापरणार असतील, तर ग्रामस्थही 7 दिवसांनंतर जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसणार आहेत. पूर्वीची दोन निलंबने आणि वारंवार होणारे भ्रष्टाचाराचे आरोप मुख्याध्यापक चाऊस यांच्यावर आधीही विविध प्रकारच्या शाळा-कारभारातील अनियमितता, निधी गैरवापर व शिक्षण गुणवत्तेवर परिणाम करणार्‍या संशयास्पद व्यवहारांचे आरोप झाले होते. त्यातून दोनदा निलंबन झाल्यानंतरही सुधारणा न झाल्याने ग्रामस्थांनी या तिसर्‍या निलंबनाला शेवटची इशारतीची पायरी म्हणून संबोधले आहे. वारंवार कारवाया झाल्या तरीही त्यांच्यावरील खात्रीशीर निर्णय न घेतल्यामुळेच त्यांची हिम्मत वाढली, असे निवेदनात म्हटले आहे.

गावकर्‍यांची एकमुखी मागणी: बडतर्फीशिवाय पर्याय नाही

राममूर्ती येथील शालेय समिती अध्यक्ष भागवत मुळे, उपाध्यक्ष रशीद मदार घोचीवाले यांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातील भ्रष्टाचार सहन केला जाणार नाही. तिसर्‍यांदा निलंबन झालेले अधिकारी सेवेत राहण्यास पात्र नाहीत, अशा ठाम निष्कर्षापर्यंत ग्रामस्थ पोहचले आहेत.

संपूर्ण प्रकरणाची स्वायत्त चौकशी आणि शिक्षक संघटनांची भूमिका तपासा – ग्रामस्थांची मागणी,ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेकडे दोन प्रमुख मागण्या ठामपणे मांडल्या आहेत, मुख्याध्यापक अब्दुल्ला चाऊस यांची सर्व प्रकरणे एकत्र करून तात्काळ बडतर्फ करा., शिक्षक संघटना प्रशासनावर दबाव आणत असल्यास त्यांच्या कार्यपद्धतीची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. येत्या सात दिवसात योग्य कारवाई न झाल्यास उपोषणाला बसण्याचा ईशाराही निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.

या निवेदनावर शालेय समितीचे अध्यक्ष भागवत मुळे, शालेय समिती उपाध्यक्ष रशीद घोचीवाले, रामकिसन मुळे, रावसाहेब गिराम, संजय शिंगाडे, कैलास राऊत, गोरखनाथ मुळे, चंद्रकांत कदम, अमोल गिराम, विठ्ठल गिराम, दत्ता गिराम, दिलीप गिराम, ओमकार मुळे, गंगाराम गिराम, डिगांबर गिराम, दिलीप मुळे, प्रकाश गिराम, रमेश मुळे, प्रताप गिराम, संदीप गिराम, शरद लकडे, राजेंद्र मुळे, बालाजी मुळे, रामेश्वर उगले, रामप्रसाद मुळे, कैलास मुळे, भगवान गिराम, सुधाकर गिराम, कृष्णा गिराम, गणेश चौधरी, मधुकर चौधरी, गंगाधर शिंगणे, प्रकाश मगर, दत्ता खरात, गणेश चौधरी, सुदाम सातपुते, अमोल गोरे, सुधाकर पाटोळे, अजय गिराम, नारायण मुळे, ज्ञानेश्‍वर मुळे, विलास मुळे, लक्ष्मण सातपुते, विकास मगर, सचिन मगर, गणेश मुळे, सुलाबाई मगर, राजेंद्र मगर, बाबासाहेब ढोले, ईस्माईल परसुवाले, नारायण शिंगणे, हरीभाऊ गिराम, विकास मुळे, किसन चौधरी, आकाश मुळे, गणेश गिराम, लक्ष्मण मुळे, अर्जुन शिंगाडे, शेलार गिराम, दत्ता रोडगे, भाऊसाहेब, शकील परसुवाले, अनील मुळे, संतोष गिराम, विठ्ठल चौधरी, संभाजी शिंगाडे, दामोधर कोल्हे, मुकेश मगरे, संतोष शिंमगे, प्रदीप खरात, भाऊसाहेब गिराम, परमेश्‍वर गिराम, लाला परसुवाले, विष्णु मगर, सुरेश गोरे, निवृत्ती गिराम, मिलींद मगरे, गौरव गिराम, सोमनाथ मुळे, अप्पासाहेब नंदनवरे, अमोल गोरे, विष्णु शिंगाडे, कारभारी शिंगाडे, याकुब परसुवाले, सुधाकर मगर, पीरू परसुवाले, अशोक मगर, रशीद घोचीवाले, उस्मान परसुवाले, सीराज घोचीवाले, जलाल मुन्नीवाले, शहारुख घोचीवाले, अजिज घोचीवाले, अनिस परसुवाले, मोहम्मद घोचीवाले, ख्वाजा चौधरी, संजय शिंगाडे, शिवाजी शिंगाडे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत

संबंधित पोस्ट

डॉ.कराड यांनी घेतला औट्रम घाट भुयारी मार्ग,गॅस पाईपलाईनसह विविध विषयांचा आढावा

कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेत मनसेचा शिवसेनेला पाठिंबा, महापौर महायुतीच्या घटकपक्षांच्या चर्चेनंतर होणार – श्रीकांत शिंदे

vishwatmaklokswamivarta

आषाढी पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना आरोग्य सेवेचा दिलासा! मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षामार्फत दोन ठिकाणी चरणसेवा उपक्रमांचे आयोजन

सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका 2026: सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा आणि मतदार सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार

डॉ. देशपांडे बाल विद्यामंदीर सांगली येथेकायदेविषयक जनजागृती शिबीर संपन्न

vishwatmaklokswamivarta

आपलं मंत्रालय’ अंकाचे सचिव तथा मुख्य राजशिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे यांच्या हस्ते प्रकाशन