vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जागतिक शौचालय दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यात “हमारा शौचालय, हमारा भविष्य” मोहिमेला सुरुवात मोहीम १० डिसेंबर मानवी हक्क दिनापर्यंत राबविली जाणार

जागतिक शौचालय दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यात “हमारा शौचालय, हमारा भविष्य” मोहिमेला सुरुवात मोहीम १० डिसेंबर मानवी हक्क दिनापर्यंत राबविली जाणार

ठाणे, प्रतिनिधी (जिल्हा परिषद, ठाणे) – जागतिक शौचालय दिन (World Toilet Day) निमित्त जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) विभागामार्फत “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही विशेष स्वच्छता मोहीम आजपासून सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम १० डिसेंबर २०२५ मानवी हक्क दिनापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, तालुकास्तरीय अधिकारी व स्वच्छता कर्मचारी यांना मोहिमेची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, “शौचालय ही केवळ सुविधा नसून प्रत्येकाच्या आरोग्याची, प्रतिष्ठेची आणि सुरक्षिततेची हमी आहे. गावांच्या सर्वांगीण विकासात स्वच्छतेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.”

*मोहिमेचे प्रमुख उद्दिष्टे*जिल्ह्यातील सर्व वैयक्तिक व सामुदायिक शौचालयांची तपासणीअपूर्ण, तुटकी किंवा देखभालीची गरज असलेली शौचालये ओळखून त्वरित दुरुस्ती

शौचालयांचे सुशोभीकरण, रंगकाम व स्वच्छता उपक्रम सुरक्षित मलनिस्सारण, आरोग्यविषयक स्वच्छता आणि पर्यावरणपूरक स्वच्छतेबाबत जनजागृती यासाठी गावस्तरावर शाळा, स्वयंसहाय्य गट, युवक मंडळे, निवृत्त सैनिक, सामाजिक संघटना यांचा सक्रिय सहभाग घेण्यात येणार आहे.

*मोहिमेचा कालावधी उपक्रम*१९ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२५ या कालावधीत गावागावांत शौचालय स्वच्छता व देखभाल मोहीम, शौचालय सुशोभीकरण स्पर्धा, स्वच्छता शपथ व ग्रामसभा जनजागृती, शालेय विद्यार्थ्यांनी जनजागृती रॅली, पाणी व्यवस्थापन व सुरक्षित स्वच्छता मार्गदर्शन उपक्रम राबविण्यात येणार आहे.

मोहिमेच्या शेवटी जिल्ह्यातील “सर्वोत्कृष्ट वैयक्तिक शौचालय” आणि “सर्वोत्कृष्ट सामुदायिक शौचालय” यांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. हा समारोप १० डिसेंबर, २०२५ रोजी करण्यात येईल.

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प संचालक श्री. पंडीत राठोड यांनी सांगितले की,“शौचालयांची स्वच्छता, सुशोभीकरण आणि नियमित देखभाल ही स्वच्छ गावाची गुरुकिल्ली आहे. या मोहिमेत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन केले आहे. .जिल्हा प्रशासनाने सर्व ग्रामपंचायतींना मोहिमेतील उपक्रम गांभीर्याने राबविण्याचे निर्देश दिले असून गावागावांतून जनसहभागाद्वारे स्वच्छतेचा मजबूत संदेश देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

000

संबंधित पोस्ट

एमएमआरडीएच्या  चेंबूर ते ठाणे दरम्यान तयार करण्यात येत असलेल्या फ्री वे एक्स्टेंशनच्या कामात बाधीत होत असलेल्या १६९४ झोपडपट्टीधारकांपैकी चार झोपडपट्टी धारकांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाटप

स्थानिक प्राधिकारी विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर,निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज- अपर जिल्हाधिकारी अडकुणे

बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाकडून सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन 

विदर्भातील ११ आणि मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात दुग्धविकास प्रकल्प राबविणार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्यात नवी दिल्लीत बैठक

vishwatmaklokswamivarta

जालना महानगरपालिका – 372 नळ कनेक्शनचे नियमितीकरण 2715600 रुपये वसुल.

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय लोक न्यायालयात ७०४ कोटींची प्रकरणे निकाली