vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा यशस्वीतेसाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे!- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

‌कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा यशस्वीतेसाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे!- पालकमंत्री शंभूराज देसाई*

सातारा प्रतिनिधी : कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचे मरळी येथे आयोजन करण्यात येणार आहे. या महोत्सवाचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ होण्यासाठी व यशस्वीतेसाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

पालकमंत्री कार्यालयात कोयना दौलत डोंगरी महोत्सवाच्या नियोजनाची बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मागील वर्षी झालेल्या डोंगरी महोत्सवापेक्षा या वर्षीच्या डोंगरी महोत्सवाचे स्वरुप मोठे असले पाहिजे, असे निर्देश देऊन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले या वर्षीचा डोंगरी महोत्सव पाच दिवसांचा असणार आहे. यामध्ये बोट, घोडेसवारी, फनफेर, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम घेण्यात यावेत. डोंगरी महोत्सवात कृषी विभागाने शेतकऱ्यांना नव तंत्रज्ञानाची माहिती मिळेल यासाठी विविध स्टॉल उभारावेत.

डोंगरी महोत्सवात ड्रोन, लेझर शो बरोबर हेलीकॉप्टर सफारीचेही आयोजन करावे. मागील डोंगरी महोत्सवात नागरिकांना ज्या गोष्टी आवडल्यात त्या जास्तीच्या उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, असेही त्यांनी सांगितले.

0000

संबंधित पोस्ट

शंभर फुटी तिरंगा, प्रा. शरद पाटील स्मृती उद्यानाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

१० वीची पुस्तके दान अभियानातून महिलांचे शैक्षणिक सक्षमीकरण; नागरिकांना सहभागाचे आवाहन-मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या संकल्पनेतून उपक्रम

मातंग समाजाला राजकीय वाटा मिळवून देणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

१५ मार्च – जागतिक ग्राहक दिन ; ग्राहकांना अधिकार देणारा दिवस

भारतीय जनगणना २०२७’ विषयक प्रशिक्षण सत्राच्या उद्घाटन 

vishwatmaklokswamivarta

पत्रकारांसाठी व्यापक आरोग्य शिबीर आयोजित करू केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा पुढाकार…