ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्जदारांसाठी 50 टक्के व्याज सवलतीची ओटीएस योजना
सांगली, प्रतिनिधी : ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रकमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याजात 50 टक्के सवलत (सूट) देण्याबाबतची (OTS) योजना दिनांक 31 मार्च 2027 पर्यंत लागू करण्यात येत आहे. यानुसार थकबाकीदार लाभार्थींनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. एन. माने यांनी केले आहे