vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्यात ‘स्वच्छ सुंदर माझे कार्यालय’ उपक्रम साजरा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्यात ‘स्वच्छ सुंदर माझे कार्यालय’ उपक्रम साजरा

अहिल्यानगर, प्रतिनिधी शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत सुरू असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा २०२६ अंतर्गत आज ‘स्वच्छ सुंदर माझे कार्यालय, जलपुनर्भरण अभियान’ हा उपक्रम अहिल्यानगर मध्यम प्रकल्प विभाग कार्यालय व सिंचन भवन परिसरात उत्साहात राबविण्यात आला. सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत पार पडलेल्या या मोहिमेची सुरुवात कार्यकारी अभियंता ज. म. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली.

या पंधरवाड्याचा कालावधी दि. १५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२६ असा असून जलसंपदा विभागाच्या नियोजनानुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याअंतर्गत कार्यालय परिसर स्वच्छ व सुस्थितीत ठेवणे व जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

अभियानादरम्यान जलसंपदा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यालय परिसरासह अंतर्गत विभाग व वसाहतींमध्ये स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेचा संदेश दिला.कार्यकारी अभियंता यांच्या अखत्यारीतील ताजनापूर मध्यम प्रकल्प बांधकाम उपविभाग क्र. १ व २, शेवगाव तसेच राहुरी व अहिल्यानगर येथील मध्यम प्रकल्प बांधकाम उपविभागांमध्येही स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे

संबंधित पोस्ट

अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाला राज्यात ‘ई-गव्हर्नन्स’ मध्ये तृतीय क्रमांक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा-22 वा हप्ता होणार 13 मार्चला वितरित,राज्यातील 91 लाख शेतकरी कुटुबांना 1,837 कोटी रुपयांचा लाभसमारोहचे थेट प्रक्षेपन https://pmindiawebcast.nic.in या लिंकवर उपलब्ध

महालक्ष्मी मंदिरात अंनिसचा ‘जागर स्त्रीशक्तीचा’; चमत्कारांच्या प्रात्यक्षिकांतून अंधश्रद्धेवर प्रबोधन

vishwatmaklokswamivarta

नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज शेषराव ऊर्फ राज सूर्यवंशी याच्या विरोधात दिल्ली न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केलं. 

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

राज्यात पेट्रोलियम पदार्थांचा पुरेसा साठा;एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शासनाची व्यापक उपाययोजना- अन्न नागरी पुरवठा अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर