vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध

      सांगली, प्रतिनिधी : पेट्रोल व डिझेलचे सुरक्षित वितरण व्हावे तसेच पेट्रोल डिझेलचा अवाजवी साठा रोखण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरावरील दक्षता व फिरते पथकांच्या तपासण्या सुरु असून पेट्रोल डिझेलचे सुरळीत वितरण करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल, डिझेल व एलपीजीचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे याचा ग्राहकांना सुरळीत पुरवठा सुरू राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनामार्फत प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल व डिझेलचा साठा उपलब्ध आहे. एचपीसीएल कंपनीचा पेट्रोल 450 किलो लिटर व डिझेल 580 किलो लिटर, बीपीसीएल कंपनीचा पेट्रोल 630 किलो लिटर व डिझेल 780 किलो लिटर आणि आयओसीएल कंपनीचा पेट्रोल 1510 किलो लिटर व डिझेल 1540 किलो लिटर इतका साठा उपलब्ध आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्राहकांना पेट्रोल व डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. ग्राहकांनी पेट्रोल व डिझेल पंपावर अनावश्यक गर्दी करणे टाळावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 तसेच जिल्ह्यात एलपीजीचाही पुरेसा साठा उपलब्ध आहे. एचपीसीएल कंपनीचा 821 मेट्रिक टन, बीपीसीएल कंपनीचा 57.3 मेट्रिक टन आणि आयओसीएल कंपनीचा 39 मेट्रिक टन इतका साठा उपलब्ध असून आणखी 96.5 मेट्रिक टन एलपीजी साठा जिल्ह्यात येण्यास मार्गस्थ आहे. त्यामुळे जिल्ह्यातील घरगुती ग्राहकांना गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत सुरू राहणार आहे. ऑनलाइन बुकिंग केलेल्या ग्राहकांना उपलब्धतेनुसार क्रमाने सिलिंडर वितरीत करण्यात येणार असल्याचेही प्रसिध्दीपत्रकाव्दारे स्पष्ट करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

नवीन वर्षाच्या निमित्ताने वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ..

vishwatmaklokswamivarta

झवेरी बाजार परिसराचा कायापालट करण्यास शासन सहकार्य करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपहिल्या ‘झवेरी बाजार जेम्स अँड ज्वेलरी फेस्टिवल 2025’ चे उद्घाटन

आम आदमी पार्टी च्या प्रदेश सचिव पदी सुग्रीव मुंडे यांची नियुक्ती

शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदीसाठी कोल्हापुरात हिंदुत्वनिष्ठांचे तीव्र आंदोलन!चुकीचा वा धार्मिक भावना दुखावणारा इतिहास मांडणाऱ्या या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी या मागणीसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन..

vishwatmaklokswamivarta

राज्यातील उद्वाहन तपासणीची प्रक्रिया अधिक गतिमान करणा    — ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

पायाभूत विकास प्रकल्पांसाठी युनिक आयडी पोर्टल प्रशिक्षण कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta