vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अक्षयतृतीयेला सांगली जिल्ह्यात बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या  – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील- बालविवाह ठरला किंवा होत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा पोलीस   विभागाच्या 112 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- नियम मोडल्यास होणार कडक कारवाई वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालयचालक, जाणीव पूर्वक व जबरदस्तीने बाल विवाह   केल्यास होणार गुन्हे दाखल 

अक्षयतृतीयेला सांगली जिल्ह्यात बालविवाह होणार नाही याची दक्षता घ्या  – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील- बालविवाह ठरला किंवा होत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा पोलीस   विभागाच्या 112 या टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- नियम मोडल्यास होणार कडक कारवाई वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालयचालक, जाणीव पूर्वक व जबरदस्तीने बाल विवाह   केल्यास होणार गुन्हे दाखल

सांगली, प्रतिनिधी: अक्षयतृतीयेचा मुहर्त हा अत्यंत शुभ मानला जातो मात्र या दिवशी छुप्या मार्गाने बालविवाह होण्याची शक्यता नाकारता येत नाही ग्रामीण व शहरी भागात अक्षयतृतीया (19 एप्रिल ) होणाऱ्या विवाह सोहळयामध्ये बालविवाह होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील यांनी केले आहे.

  भारतीय कायद्यानुसार विवाहासाठी मुलाचे वय 21 आणि मुलीचे 18 वर्ष पुर्ण असणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह केल्यास तो बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार बेकायेदशीर ठरतो. या कायद्याची अमंलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांना सक्रिय राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गावागावात सरपंच, पोलीस पाटील आणि अगंणवाडी सेविका यांनी सर्तक राहून विवाहापूर्वी मुला – मुलींच्या वयाची खात्री करणे आवश्यक आहे. बालविवाह लावणे हा दखलपात्र गुन्हा असून यात केवळ पालकांवरच नाही तर विवाह सोहळ्यात सहभागी होणारे वऱ्हाडी, भटजी, वाजंत्री, मंगल कार्यालयचालक, मंडप डेकोरेर्टस जाणीव पूर्वक व जबरदस्तीने बाल विवाह केल्यास गुन्हे दाखल होऊ शकतात. दोषींना २ वर्षे सश्रम कारावास आणि 1 लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून संशयास्पद विवाहाची माहिती तात्काळ टोल फ्री 1098 या क्रमांकावर तक्रार देण्याचे आवाहान करण्यात आले आहे.

 

 येथे करा तक्रार ,तुमच्या गावात किंवा परिसरात बालविवाह ठरला असल्यास किंवा होत असल्यास त्याबाबतची माहिती चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा पोलीस विभागाच्या 112 या टोल फ्री क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी- पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे-सिद्धिविनायक मंदिर परिसरात सिंगल युज प्लास्टिक विरोधात जनजागृती कार्यक्रमातून मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन

नांदेड विधान परिषद स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर18 जून रोजी मतदान ; जिल्ह्यात आदर्श #आचारसंहिता लागू,

कोल्हापूर भूमी अभिलेख झाले ‘हायटेक’-३ कोटी ६९ लाखांच्या आधुनिक यंत्रसामग्रीचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण

vishwatmaklokswamivarta

भारत आरोग्य संघटनेने दिला आयुष मंत्र्यांना यांना प्रस्ताव

शाळांच्या परिसरात अपायकारक अन्नपदार्थ व कॅफिनयुक्त पेयांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई – मंत्री नरहरी झिरवाळ

पाचोरा रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शोकसंवेदना व्यक्त,मृतांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत; जखमींवर मोफत उपचार, मदत व बचाव कार्याचा दावोस येथून समन्वय..

vishwatmaklokswamivarta