vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इस्लामपूरमध्ये एका किशोरवयीन कामगाराची मुक्तता हॉटेलचालकाविरूद्ध एफ. आय. आर.

इस्लामपूरमध्ये एका किशोरवयीन कामगाराची मुक्तता हॉटेलचालकाविरूद्ध एफ. आय. आर.

       सांगली, प्रतिनिधी : बाल व किशोरवयीन कामगार मुक्ती अभियानांतर्गत टाकलेल्या धाडसत्रामध्ये इस्लामपूर येथील हॉटेल शंकरा, आष्टा नाका येथून एका किशोरवयीन कामगाराची मुक्तता करण्यात आली असून, सदर आस्थापना मालकाविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाणे येथे प्रथम खबर अहवाल (F. I. R.) नोंदवण्यात आल्याची माहिती सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

   जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या निर्देशानुसार व सहाय्यक कामगार आयुक्त मु. अ. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६ व सुधारित अधिनियम २०१६ अंतर्गत हे अभियान राबविण्यात आले.

संबंधित हॉटेल मालकाविरुद्ध इस्लामपूर पोलीस ठाणे येथे प्रथम खबर अहवाल (F. I. R.), भारतीय न्याय संहिता (बी. एन. एस.), २०२३ कलम १४६ व अल्पवयीन न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायदा, २०१५ कलम ७९ अंतर्गत दाखल करण्यात आला. तद्‌नंतर सदर किशोरवयीन कामगारास सुरक्षिततेकरिता दादुकाका भिडे, मुलांचे बालगृह येथे दाखल करण्यात आले.

 दुकाने निरीक्षक चंद्रकांत साळुंखे यांच्या नेतृत्त्वात जिल्हा चाईल्ड लाईनच्या समुपदेशक श्रीमती प्रियांका माने, जिल्हा परिषदेचे समग्र शिक्षा (प्राथमिक शिक्षण) जिल्हा समन्वयक प्रशांत शेटे, होमगार्डचे वरिष्ठ पलटण नायक महादेव देसाई, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी डॉ. यु. आर. जुगळे यांनी ही संयुक्त कार्यवाही केली.14 वर्षापेक्षा कमी वयातील बालकास कोणीही आस्थापनेत कामावर ठेऊ नये. तसेच 14 ते 18 वर्षादरम्यानच्या किशोरवयीन कामगारास कोणत्याही धोकादायक आस्थापनेत कामाला ठेऊ नये, असे आवाहन प्रसिद्धीपत्रकात करण्यात आले आहे.

00000

संबंधित पोस्ट

धान अपहार प्रकरण: देऊळगाव खरेदी केंद्रातील धान अपहार प्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा; प्रादेशिक व्यवस्थापक कार्यालयाची कारवाई

🎖️ ज्येष्ठ अभिनेते आणि निर्माते मागांती मुरली मोहन यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर.

पुष्कर तारो सेट परिक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश 

पुणे विभागातील कर्करोग रुग्णालयाच्या कामाला तातडीने गती देण्यात येईल – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आळंदी येथे पेटसिटी युनिटचे लोकार्पण

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी त्‍यांचा सत्‍कार केला

केंद्र शासनाच्या योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करा— खा. श्रीरंग बारणे,जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta